पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित फळपिक विमा योजना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना जिल्‍हयात सन 2019-20 या वर्षासाठी राबविण्‍यात येणार आहे. या मृगबहार योजने अंतर्गत जिल्‍हयातील अधिसूचित पीक संत्रा विमा संरक्षित रक्‍कम प्रति हेक्‍टर 77 हजार शेतक-यांनी भरावयाची पीक विमा हप्‍ता प्रति हेक्‍टर रुपये 3 हजार 850 असून पिक विमा भरावयाची अंतिम तारीख 14 जून 2019 आहे.

मोसंबी विमा संरक्षित रक्‍कम प्रति हेक्‍टर 77 हजार शेतक-यांनी भरावयाची पीक विमा हप्‍ता प्रति हेक्‍टर रुपये 3 हजार 850 असून पिक विमा भरावयाची अंतिम तारीख 1 जूलै 2019, पेरु विमा संरक्षित रक्‍कम प्रति हेक्‍टर 55 हजार शेतक-यांनी भरावयाची पीक विमा हप्‍ता प्रति हेक्‍टर रुपये 2 हजार 750 असून पिक विमा भरावयाची अंतिम तारीख 14 जून 2019, चिकू विमा संरक्षित रक्‍कम प्रति हेक्‍टर 55 हजार शेतक-यांनी भरावयाची पीक विमा हप्‍ता प्रति हेक्‍टर रुपये 2 हजार 250 असून पिक विमा भरावयाची अंतिम तारीख 1 जुलै 2019, डाळिंब विमा संरक्षित रक्‍कम प्रति हेक्‍टर 1 लाख 21 हजार शेतक-यांनी भरावयाची पीक विमा हप्‍ता प्रति हेक्‍टर रुपये 6 हजार 50 असून पिक विमा भरावयाची अंतिम तारीख 15 जुलै 2019 व लिंबू विमा संरक्षित रक्‍कम प्रति हेक्‍टर 66 हजार शेतक-यांनी भरावयाची पीक विमा हप्‍ता प्रति हेक्‍टर रुपये 3 हजार 300 असून पिक विमा भरावयाची अंतिम तारीख 14 जून 2019 पर्यत आाहे.

सदर विमा कंपनीचे नाव बजाज अलायन्‍झ जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी कॉमरझोन पाहिला मजला टॉवर 1 सम्राट अशोक पथ जेल रोड येरवडा पुणे असे असून संपर्क दुरध्‍वनी क्रमांक 020 66240137 टोल फ्री क्रमांक 1800 209 5959 असा आहे.

प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना मृगबहार योजनेत जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी सहभागी व्‍हावे अधिक माहितीसाठी जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्‍या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे बरोबरच नजिकच्‍या बँकेशी संपर्क साधावा असे जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.