Revolt ची इलेक्ट्रिक बाइक ‘महागली’, सिंगल चार्जमध्ये धावते 145 km

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुणे आणि दिल्लीत Revolt कंपनीच्या ई मोटार सायकलला बाइक प्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यशानंतर आता कंपनी अन्य शहरात देखील एंट्री करण्याच्या तयारीत आहे. आता या बाइक्स चेन्नई, हैदराबाद, अहमदाबादमध्ये देखील उपलब्ध असतील. परंतु यासह कंपनीने या बाइक्सच्या किंमतीत वाढ केली आहे.

आता या बाइकची नवी किंमत 1 लाख 3,999 रुपये झाली आहे. याआधी ही किंमत 98 हजार 999 रुपये होती. कंपनीची ही वाढ वन टाइम पेमेंट ऑप्शनसाठी आहे. याशिवाय तुम्हाला बाइकच्या बुकींगसाठी 3,999 रुपये भरावे लागतील. याशिवाय, तुम्हाला रजिस्ट्रेशन/RTO, इंश्युरंस, स्मार्ट कार्ड, 3 वर्ष 4G कनेक्टिव्हिटीसाठी अनिवार्य शुल्कही द्यावे लागेल.

4G LTE Sim –
RV400 ही बाइक कंपनीने रेबेल रेड आणि कॉस्मिक ब्लॅक या रंगात उपलब्ध करुन दिली आहे. या स्मार्टबाइकमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे. बाइक लोकेशन, जिओ फेंसिंग, टेलेमॅटिक्स आणि साऊंड सिलेक्शन यासारखे खास फीचर्स या बाइकमध्ये आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 4 प्री लोडेड मोटार सायकल साऊंड्स दिले आहेत, यातील तुम्हाला आवडेल तो साऊंड तुम्ही निवडू शकतात.

विशेष काय तर मोबाइलच्या रिंगटोन प्रमाणे तुम्ही याचा साऊंड बदलू शकतात. ओव्हर दि एअर अपडेटच्या माध्यमातून साऊंडसाठी आणखी अपडेट दिले जातील असेही कंपनीने सांगितले आहे. रिव्होल्ट आरव्ही 400 बाइक 4G LTE सिम असलेली बाइक असून याद्वारे बाइकमध्ये दिलेले सर्व इंटरनेट फीचर्स काम करतील.