खुशखबर ! 156 km च ‘आव्हरेज’ देणारी ‘ही’ बाईक 28 ऑगस्टला ‘लॉन्च’, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा प्रोत्साहन देत आहे यासाठी सरकारने त्यावर लागणारा कर देखील कमी केला आहे. त्यामुळे भारतीय बाजारात आता अनेक इलेक्ट्रिक वाहने येत आहेत. Revolt RV४०० या इलेक्ट्रिक वाहनाची चर्चा सुरु झाली आहे, ही एक इलेक्ट्रिक बाइक आहे. ही देशातील पहिली आर्टिफिशल इंटेलिजेंस लेस इलेक्ट्रिक मोटार सायकल असेल. नुकतीच कंपनीनेे ही बाइक बाजारात आणली आहे. याची दिल्लीत प्री बुकींग देखील सुरु झाली आहे. यात अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

बुकिंग किंमत फक्त १ हजार रुपये
या दुचाकीची किंमत १ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. याची प्री बुकींग सुरु झाली आहे, ग्राहक १००० रुपये देऊन यांची बुकींग करु शकतात. Revolt मोटर्सने पहीली Rv४०० ही बाइक भारतीय बाजारात आणली आहे. ही कंपनी त्यांच्या प्लँटमध्ये १,२०,००० बाइक्स तयार करु शकते. ही बाइक काळ्या आणि लाल रंगात उपलब्ध असणार आहे.

बाइकमध्ये ४G LTE सिम
यात बाइकमध्ये कनेक्टिविटीचे अनेक नवनवे फिचर्स सहभागी करुन देण्यात आले आहेत. यासाठी एक खास स्टॅन्ड देण्यात आले आहे, यात तुम्ही तुमच्या आवडीने स्टॅन्ड निवडू शकतात. याशिवाय या बाइकमध्ये ४G LTE सिम देण्यात आले आहे, ज्यामुळे या बाइकचे सर्व इंटरनेट आधारित फिचर काम करु शकतात.

ही बाइक एकदा फुल चार्ज केल्यानंतर १५६ km धावते. याचे सर्वात जास्त स्पीड ८५ किलोमीटर प्रति तास आहे. यात रिवोल्ट पोर्टेबल बँटरी चार्जरबरोबर ऑन बोर्ड चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही बाइक २८ ऑगस्टला लॉन्च करण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यात ही बाइक अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर, पुणे, बेंगलुरु, चेन्नई येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त