गणेश विसर्जन मिरवणुकीतून  ‘बिल्डर’चे विदेशी रिव्हॉल्व्हर गायब

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काल गणेशोत्सव विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. ढोल तश्याच्या गजरात आणि ‘डिजे’च्या दणक्यात गणपतीला निरोप देण्यात आला. मात्र या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना डोकेदुखी वाढलेली घटना घडली आहे. पिंपरी परिसरात सुरू असलेल्या विसर्जन सोहळ्यात  बांधकाम व्यावसायिकाचे परदेशी रिव्हॉल्व्हर हरवले. पोलिसांनी संपूर्ण रात्रभर शोधूनही रिव्हॉल्व्हर मिळाले नाही. मात्र याबाबत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नसल्याचे सांगण्यात आले, परंतु रिव्हॉल्व्हर कोणी घेतले? हा प्रश्न पडला असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’836f9ff4-bffa-11e8-ba41-b37c5d9f2930′]

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्पमधील साधू वासवानी गार्डनजवळ गणेश मंडळाची विसर्जन सुरू होती. ढोल ताशा पाथकाच्या गजरात मिरवणूक सुरू होती.  त्यावेळी एक बांधकाम व्यावसायिक मिरवणुकीत सहभागी झाला. यावेळी आनंद साजरा करत असताना त्यांच्या जवळील विदेशी परवाना असलेले रिव्हॉल्व्हर गायब झाले. हे रिव्हॉल्व्हर कधी, कुठे आणि कसे पडले किंवा गायब झाले? हे माहित नाही.

दौंड शहरामध्ये साडेचार लाखांची चोरी

रिव्हॉल्व्हर गायब झाल्यानंतर लगेचच चिंताग्रस्त बांधकाम व्यावसायिकांनी पिंपरी पोलिसांना माहिती दिली. पिंपरीमध्ये विसर्जनाच्या रॅलीतुन पिस्तुल गायब झाले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर, पोलिसांनी मिरवणुकीत असणाऱ्या सर्वांकडे चौकशी केली. ढोल ताशा पथकाच्या सदस्यांकडेही विचारपूस केली. विसर्जन मार्गाची कसून पाहणी केली, मात्र ते सापडले नाही. हरवलेल्या रिव्हॉल्व्हरची अद्याप तक्रार पोलीस ठाण्यात दिलेली नाही.  हे रिव्हॉल्व्हर चुकीच्या, गुन्हेगारांच्या हातात पडले तर? हा प्रश्न पोलिसांसमोर पडला असून शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.