इंजिनियरिंगचा विद्यार्थी प्रेयसीमुळं बनला ‘दरोडेखोर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – प्रेमासाठी हल्ली कोण काय करेल याचा काही अंदाज नसतो. कोणी प्रेमासाठी जीव देतो, तर कोणी प्रेम मारामारीही करतो. त्यात भर म्हणून की काय प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी अलीकडे तरुण चोऱ्याही करु लागले आहेत. मध्यप्रदेशील रिवामध्ये अशाच एका प्रकरणामध्ये एका दरोडेखोर प्रियकराला त्याच्या टोळीसह अटक करण्यात आली आहे. प्रेयसीच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी त्याने चोरी करत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

रिवाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक शिवकुमार शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, एका तक्रारदाराने चोरीची तक्रार दाखल केली होती. त्या माहितीनुसार पोलीसांनी मनीष तिवारी आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीप्रमाणे त्याच्याकडे मोबाईल, दुचाकीसह इतर साहित्यही मिळाले. अधिक चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, प्रेयसीच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी त्यांनी शहरात चोऱ्या केल्या आहेत. तिवारी हा इंजिनीयरींगचा विद्यार्थी आहे. उच्चशिक्षित तरुण फक्त प्रेयसीच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी चोऱ्या करत असल्याने पोलीसांनाही धक्का बसला आहे.

रिवा पोलीस ठाण्यात पोलीस एका दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करत होते. सायबर सेलच्या साहाय्याने त्यांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करुन त्यांनी तिवारीला अटक केली. तिवारीने दिलेल्या माहितीनंतर त्यांनी टोळीचा मोहरक्या सुजीत पांडेला ताब्यात घेतले. दोघेही इंजिनियरींगचे विद्यार्थी आहेत. प्रेयसीचे हट्ट पुरविण्यासाठी त्यांनी शहरात ठिकठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like