‘रंगीला’ सिनेमाच्या नव्या व्हर्जनचा ट्रेलर रिलीज ! पहा नैना गांगुलीचा ‘HOT’ रोमँस (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राम गोपल वर्मांचा मल्टीस्टारर सिनेमा रंगीला एका नव्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात उर्मिला मातोंडकर, आमिर खान, जॅकी श्रॉफ यांचा अभिनय प्रेक्षकांनी पाहिला होता. हा सिनेमा खूप गाजला. राम गोपाल वर्मा या सिनेमाचं नवं व्हर्जन घेऊन येत आहेत. या व्हर्जनमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्री नैना गांगुलीला लाँच करणार आहेत. ब्युटीफुल(Beautiful- an ode to Rangeela) असं या सिनेमाचं नाव आहे. नैनाची हॉट अदा पाहण्यासारखी आहे.

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मनी इज नॉट ऑलवेज ब्युटीफुल अशा डायलॉगवर ट्रेलर संपतो आहे. रंगीला सिनेमासारखीच या सिनेमाची कथा आहे. नायक आणि नायिका दोघंही सर्वसामान्य परिस्थितीत वाढतात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात असतात. परंतु नायिका श्रीमंत होते. नंतर पैसा प्रेमाच्या आड येताना दिसतो असं काहीसं यात पहायला मिळणार आहे.

1995 साली रंगीला सिनेमा आला होता. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच्या नव्या व्हर्जनमध्ये आता नैना आणि अभिनेता पार्थचा रोमँस पाहायला मिळत आहे.

 

visit : Policenama.com