ड्रग्ज केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते ? NCB नं केला खुलासा

पोलिसनामा ऑनलाइन – सुशांत केसमध्ये ड्रग अँगल समोर आल्यानंतर आता एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनवर खोलवर तपास करत आहे. यात अनेक बडी नावं समोर आली आहेत. एनसीबीनं बुधवारी या प्रकरणी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यांनी अभिनेत्रींना क्लीन चीटही दिलेली नाही. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात 10 ते 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते असंही एनसीबीनं यावेळी सांगितलं.

एका वृत्तानुसार, जेव्हा एनसीबीला विचारण्यात आलं की, रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांचं म्हणणं आहे की, या प्रकरणात सुशांत सिंह केसशी काय संबंध आहे. याचा काय अर्थ आहे. यावर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही चुकीची व्याख्या आहे. सुशांतच्या केसशी आमचं काहीही देणंघेणं नाही. सुशांतची केस सीबीआय बघत आहे. आमचा तपास केवळ ड्रग कार्टेलशी संबंधित आहे.”

एका प्रश्नाचं उत्तर देताना एनसीबीनं सांगितलं की, या ड्रग कार्टेलमध्ये केवळ एकटा सुशांत नाहीये. एजन्सीनं आतापर्यंत 19 लोकांना अटक केली आहे. ही केस सुशांतला मुख्य आरोपी बनवून चालवली जात नाहीये. हा एक मोठा ग्रुप आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांवर ड्रग जमा करणं, त्यासाठी पैसे देणं आणि आर्थिक मदत करणं असे अरोप आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना या तपासात कर्मशियल प्रमाणात गांजा आणि चरस मिळाला आहे. आतापर्यंत 1.4 किलो चरस आणि मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला आहे. हा एक सुनियोजित गुन्हा आहे. यात रिया आणि शौविकला 10 ते 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते असंही एनसीबीनं सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like