Birthday SPL : ‘या’ मालिकेतून केला होता डेब्यू, सुशांत सिंह राजपूतच्याआधी ‘या’ अभिनेत्यासोबत अफेअरची चर्चा !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सतत चर्चेत येताना दिसत आहे. रिलेशनशिपमुळंही दोघांची खूप चर्चा झाली होती. आज (बुधवार दि 1 जुलै 2020) रिया तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. रियाचा जन्म 1 जुलै 1992 रोजी बंगाली कुटुंबात झाला आहे. आज आपण रियाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

रियानं तिच्या करिअरची सुरुवात 2009 साली टीव्ही इंटडस्ट्रीतून केली होती. तिनं टीव्हीएस स्कुटी टीन डीवामध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत ती रनरअप राहिली आहे.

असंही सांगितलं जातं की, रियानं रणवीर सिंगच्या बँड बाजा बारात या सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. परंतु ती रिजेक्ट झाली होती.

रियाच्या लव लाईफबद्दल बोलायचं झालं तर तिचं नाव बॉलिवूड अ‍ॅक्टर आदित्य रॉय कपूरसोबतही जोडलं गेलं आहे. दोघं अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. परंतु आदित्य आणि रिया यांनी कोणीही यावर कधीच भाष्य केलं नाही.

सुशांत रियाच्या अफेअरच्या चर्चांनी तेव्हा जोर धरला होता जेव्हा लडाख ट्रीपवर दोघांचेही एकाच मुलासोबतच सेपरेट फोटो समोर आले होते. सुशांत आणि रिया खूप दिवस एकत्र राहिले. दोघं लग्नही करणार होते. परंतु रिया किंवा सुशांतनं यावर कधी खुलून भाष्य केलं नव्हतं.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती चेहरे सिनेमात दिसणार आहे. चेहरे सिनेमात ती बिग बी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी अशा मोठ्या कलाकारांसोबत दिसणार आहे. याच सिनेमात क्रिस्टलही डिसूजाही दिसणार आहे. तसं पाहिलं तर तिचं करिअऱ काही खास नाही चाललं. मेरे डैड की मारुति, सोनाली केबल, जलेबी अशा सिनेमात लिड रोल करूनही रिया बॉलिवूडध्ये आपली जागा तयार करण्यासाठी झटत आहे.