इंजिनियरिंग सोडून ‘ग्लॅमर’ क्षेत्रात आली रिया चक्रवर्ती, सलग 7 ‘फ्लॉप’ सिनेमे तरीही ‘मालामाल’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांत सिंह राजपूतच्या नावासह रिया चक्रवर्ती जितकी ओळखली गेली, याआधी फारच थोड्या लोकांना तिच्याबद्दल माहिती होते. सुशांतच्या नात्यात अडकल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलाने सर्वांनाच चकित केले. लोकांना आता रियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानंतर रियाच्या बाबतीत चर्चा वाढल्या आहेत. गेल्या एका वर्षापासून रिया सुशांतची लिव्ह-इन पार्टनर होती. सीबीआय या आरोपांची चौकशी करत आहे पण सुशांतच्या संशयास्पद मृत्यूमध्ये रिया चक्रवर्ती निशाण्यावर आहे.

कोण आहे रिया चक्रवर्ती ?
रिया चक्रवर्तीचा जन्म 1 जुलै 1992 रोजी बेंगलुरूमध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव इंद्रजित चक्रवर्ती आणि आईचे नाव संध्या चक्रवर्ती आहे. रियाचे वडील सैन्यात डॉक्टर होते, तर आई गृहिणी आहे. रियाला शोविक चक्रवर्ती नावाचा भाऊ आहे. रियाचे वडील बंगाली आणि आई कोंकणी आहेत.

इंजिनीअरिंग सोडून ग्लॅमर वर्ल्डमध्ये आली रिया
रिया चक्रवर्तीने तिचे शालेय शिक्षण अंबाला छावणीतील आर्मी पब्लिक स्कूलमधून केले. यानंतर तिने इंजीनियरिंगमध्ये प्रवेश घेतला, पण रियाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी इंजिनियरिंग मधूनच सोडली. यानंतर रियाने एमटीव्हीचा रिअल्टी शो ‘टीन दीवा’ मध्ये प्रवेश केला. या शोमध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली. यानंतर तिने दिल्लीतील एमटीव्हीची व्हिडिओ जॉकी होण्यासाठी ऑडिशन दिले आणि निवड झाली. व्हीजे असताना तिने ‘एमटीव्ही व्हॅसअप’, ‘कॉलेज बीट’ आणि ‘एमटीव्ही गोन 60 सेकंड्स’ होस्ट केले आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले.

रियाची चित्रपट कारकीर्द
रियाच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. ‘बँड बाजा बारात’ चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीसाठी ऑडिशन दिले होते, परंतु तिला नाकारले गेले. रियाला आपला पहिला ब्रेक बॉलीवूडमधून नाही तर टॉलीवूडमध्ये मिळाला. पहिल्यांदा ती तेलुगु चित्रपट ‘तुनेगा तुनेगा’ मध्ये दिसली. 2013 मध्ये रियाला मेरे डॅड कि मारुती या चित्रपटात जसलीनची भूमिका मिळाली होती. रियाचा तिसरा चित्रपट सोनाली केबल 2014 मध्ये आला. 2017 मध्ये ती ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘ दोबारा: सी योर ईविल’, ‘आय बँक चोर’ मध्ये दिसली होती. 2018 मध्ये आलेल्या जलेबी चित्रपटात रियाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली, पण रियाचे हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले.

वार्षिक 10-15 लाख कमावते रिया
गेल्या दोन वर्षातील आयटीआरकडे नजर टाकल्यास तिची वार्षिक कमाई 10-15 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. पण आश्चर्य म्हणजे तिच्याकडे मुंबईत अशा दोन मालमत्ता आहेत ज्यांची किंमत कोटींची आहे. सुशांतच्या वडिलांच्या आरोपानंतर ईडीने रियावर याप्रकरणी तपासणी केली आहे.