मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या नावाचा समावेश आहे. रियाने यापूर्वीच स्वतःच घरात ड्रग्स आणत असल्याचे मान्य केले आहे. NCB ने रियावर ड्रग्स खरेदी करण्याचे आणि ते सुशांतला पुरवण्याचे आरोप लावले आहेत. यामुळे रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एनसीबीने तब्बल 11,700 पानांची चार्जशीट न्यायालयात सादर केली असून त्यानुसार रियाला 10 किंवा 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
सुशांतला मारिजुआना आणि गांजा दिला जात असे. रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या घरातील मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि ऋषीकेश पवार नावाचा अन्य एक आरोपी ड्रग्स खरेदी करून सुशांतला पुरवत असे असे आरोपपत्रात नमूद केले आहे. यातील काही आरोपी हे जमिनावर बाहेर आले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. NCB च्या चार्जशीटमध्ये 32 जणांच्या विरोधात एनडीपीएस अधिनियमानच्या कलम 27 अ प्रमाणे आरोप लावला आहे. ज्यात आरोपींना 10 आणि जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कैदीची तरतूद आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज केसमध्ये रियाला अटक केले होते. त्यानंतर ती जवळपास एक महिने तुरुंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला होता.