रिया अन् सुशांतचं WhatsApp चॅटिंग समोर आल्यानंतर झाली ‘ही’ गोष्ट ‘क्लिअर’, बहिणीवर होती ‘नाराज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूतच्या सुसाइड केसमध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सुशांचे वडील केके सिंह यांनी एफआयआर दाखल करून सर्व प्रकरण उलटवले होते. एकीकडे रियावर आरोप केला जात आहे, तर दुसरीकडे रिया निरपराध असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. रियाने सुशांतची ग्रॅटिट्यूड लिस्ट शेयर केल्यानंतर आता रियाच्या वकीलांनी सुशांत आणि रियामधील व्हॉटसअप चॅटचे स्क्रीनशॉट शेयर केले आहेत. सुशांत आणि रियामध्ये जे व्हॉट्सअप मॅसेज शेयर झाले होते ते असे होते.

रिया-सुशांत की वॉट्सऐप चैट में सामने आई ये बातें, बहन से थी नाराजगी!

रिया-सुशांत की वॉट्सऐप चैट में सामने आई ये बातें, बहन से थी नाराजगी!

रिया-सुशांत की वॉट्सऐप चैट में सामने आई ये बातें, बहन से थी नाराजगी!

रिया-सुशांत की वॉट्सऐप चैट में सामने आई ये बातें, बहन से थी नाराजगी!

रिया-सुशांत की वॉट्सऐप चैट में सामने आई ये बातें, बहन से थी नाराजगी!

सुशांतकडून लिहिले गेले होते की, – तुझे कुटुंब खुप सुंदर आहे. सर (रियाचे वडील) खुप चांगले आहेत. शोविक सहानुभूतीपूर्ण आहे आणि तू जी माझी आहेस, या जरूरी बदलांसाठी तु एक कारण आहेस. तुमच्या सर्वांच्या अवतीभोवती राहणे माझ्यासाठी आनंदाचे आहे. चीयर्स माझ्या, रॉकस्टार बनण्यासाठी. सुशांतने पुढे लिहिले आहे – तू प्लीज हसत राहा, तू अशी चांगली दिसते. मी आता झोपण्याचा प्रयत्न करतो. मला एखादे जमिलासारखे स्वप्न पडावे. किती चांगले होईल ना? टाटा…’  यावर रियाकडून उत्तर लिहिले गेले आहे की, – ’हाहा…झोप माझ्या लाडक्या…फ्लाइट लँड केल्यानंतर तुला कॉल करेन आणि आशा आहे की, तू चंद्रावर लँड करशील…झोप स्वीट बाबा बॉय’. हे चॅट सायंकाळी 6 वाजून 8 मिनिट ते 6 वाजून 14 मिनिटाच्या दरम्यान झाले आहे.

यानंतर रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी रियाकडूप पुन्हा सुशांतला मॅसेज केला गेला. रियाने सुशांतच्या तब्येतीबाबत विचारले. यावर सुशांतने उत्तर दिले – ’ठिक नाही…माझी बहिण आता सिद भाईला व्हिक्टिम कार्ड खेळून मॅनिपुलेट करत आहे, जेणेकरून या सर्व गोष्टीवरून लक्ष विचलित होऊन (तीच गोष्ट जी तू आणि मी मागे सोडत आहोत) माझ्यावर यावे की, मी फिजिकली पनीशमेंट तिला दिली. हे खुप निराशाजनक आहे. यानंतर सुशांत आणि रियाची चॅटींग रात्री साडेदहा वाजता झाली. प्रथम रियाने म्हटले की, त्याने तिला मीटिंगनंतर कॉल करावा. नंतर सुशांतकडून उत्तर आले ते होते – (प्रियंकासाठी) तु कर हे, या वाईट वागण्यासाठी, दारूच्या नशेत छेडछाड करण्यात तू व्हिक्टिम कार्ड गेम खेळून तिला कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत आहेस. तर माझ्या प्रिय बहिणी, तेथे आपली आई आहे आणि देव आहे, ज्यांनी मला शिकवले, आणि तू त्या शिकवणीनुसार एक गुन्हा केला आहेस.

जर तुला आपल्या अहंकारामुळे काही दिसत नसेल तर देव तुझे भले करो कारण मी घाबरत नाही आणि पुढेही ते काम सुरूच ठेवीन जे आतापर्यंत केले आहे. मी जगात जरूर बदल घडवत राहीन. देव आणि निसर्गालाच निर्णय करू दे की कोणाचे काम योग्य आहे. सुशांतने पुढचा मॅसेज जो रियाला पाठवला तो सिदसाठी होता, ज्यामध्ये लिहिले होते – त्यांनी तुला माझ्या डोळ्यासमोर मारले आणि ते माझ्या बहिणीने केले ज्यास लोक समजतात की, दारूच्या नशेत केले असेल आणि तू त्या व्हिक्टमी कार्डवाल्या गोष्टी मानत सुद्धा आहेस. प्लीज मला हे सुद्धा सांग की, तू आणि मी ऋषीकेश बसमध्ये काय केले होते. मग तर आपण सतत लाजिरवाणे होऊ, जर बहिणीच्या नजरेने पाहिले तर. मी महिलांचा सन्मान करतो पण त्यांनी हे सुद्धा शिकवले आहे की, नेहमी खर्‍याची साथ द्यावी आणि योग्य आहे त्यास घाबरू नये.

तुला वाटते का वाद करण्याची माझी कोणतीही गोष्ट त्रासदायक आहे आणि त्यांचे कामही योग्य आहे. भाई मी सर्व नाती सोडून देईन आणि जगात पॉझिटिव्ह बदल घडवण्यासाठी जे करत आहे तेच करत राहीन. तू तेच कर जे तुला योग्य वाटते. मी समजून जाईन. दोघांमध्ये झालेली चर्चा सुशांतची बहिण प्रियंकाकडे इशारा करत असल्याचे दिसते. हे मॅसेजेस पाहून वाटते की, सुशांतची बहिण प्रियंकाने सिदवर हात उचलला होता, ज्याचा विरोध सुशांत करत होता. या व्हॉट्सअप चॅटमध्ये रियाकडून सुशांतला सपोर्ट मिळताना दिसत आहे. तर सुशांत यामध्ये आपली सर्व नाती तोडण्याबाबत बोलत आहे. यापूर्वी रियाने सुशांतची एक ग्रॅटिट्यूड लिस्ट सुद्धा शेयर केली होती, ज्यामध्ये सुशांत, रियाला आपल्या जीवनात आल्याने तिला धन्यवाद देत आहे.