रिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री, दीपिका-कतरिनालाही टाकल मागे

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा लोकप्रिय अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणामुळे त्याची कथित गर्लफ्रेंड अन् अभिनेत्री रिया चक्रवर्ती (rhea chakraborty ) च्या नावाची बरीच चर्चा झाली. NCB ने सुद्धा रिया (rhea-chakraborty) वर सुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवल्याचे आरोप दाखल केले. सुशांतच्या आत्महत्येनंतर रियावर प्रचंड टिका, आरोप झाले होते. तसेच सोशल मीडियावर ट्रोल केल गेले होते. एवढच नाही तर ड्रग्स प्रकरणी तिला तुरुंगातही जावे लागले. यामुळे तिचे करीअर धोक्यात आले होते. पण इतक सार होऊन देखील रिया चक्रवर्ती बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री ठरली आहे.

द टाईम्सने नुकतेच सर्वात प्रभावी अभिनेत्रींची यादी जाहीर केली असून यात रिया पहिल्या स्थानावर आहे. द टाइम्सकडून 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 ची यादी समोर आली आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींचा यात समावेश केला होता. ऑनलाईन वोटिंग झाल्यानंतर ही यादी समोर आली आहे. या यादीत कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, दिशा पटानी यांसारख्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींना मागे टाकत रियाने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे रियाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हे देखील वाचा

‘पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती’, ….

CM उद्धव ठाकरे घेणार मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट; …

PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

पाण्याच्या टाकीतील मृतदेह गुढ उकलले ! चार दिवसांनंतर पत्नीने दिली कबुली; म्हणाली – ‘हा, मैने किया मर्डर

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा
Web Title : rhea chakraborty most desirable women 2020