रिया चक्रवर्तीचा व्हायरल होत असलेला फोटो पाहून महेश भट्ट सर्वांना आठवले, नेटकरी म्हणाले – ‘नवीन बकरा भेटला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत( Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती( Rhea Chakraborty) आपल्या नॉर्मल लाईफमध्ये परतलीये. तिचे ताजे फोटो पाहून तरी हेच वाटते. ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यानंतर रिया जवळपास महिनाभर तुरूंगात होती. सध्या ती जामीनावर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बरेच दिवस रिया पार्ट्या, मिटींग्सपासून दूर होती. पण आता दीर्घकाळानंतर रियाचे आयुष्य पूर्वपदावर आलेले दिसतेय. तूर्तास रियाचे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. याफोटोमध्ये रिया ‘रोडिज’ फेम राजीव लक्ष्मणसोबत दिसतेय. रियाची जवळची मैत्रिण अनुषा दांडेकर हिने नुकतीच वाढदिवसाची पार्टी दिली. रियादेखील या पार्टीत सहभागी झाली. राजीवने या पार्टीतला एक फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये मध्ये रिया राजीवला मिठी मारत कॅमे-याला पोज देताना दिसतेय. ‘माय गर्ल’ या कॅप्शनसह राजीवने रियाचा हा फोटो शेअर केला आणि यानंतर थोड्याच वेळात डिलीटही केला. पण तोपर्यंत हा फोटो व्हायरल झाला होता. ट्रोल होताच राजीवने रियासोबतचा फोटो डिलीट केला. मात्र रियासाठी त्याने एक खास पोस्ट शेअर केली. रिया माझी जुनी प्रिय मैत्रिण आहे. तिला पुन्हा भेटून आनंद झाला. तिला शुभेच्छा, असे त्याने लिहिले. अर्थात यासोबतचे कमेंट्चे ऑप्शन त्याने बंद ठेवले.

दरम्यान, रिया व राजीवचा पार्टीतला हा फोटो व्हायरल होताच, सुशांतचे चाहते भडकले. राजीवने रियाला ‘माय गर्ल’ संबोधल्याने तर सुशांतच्या चाहत्यांचा पारा आणखीच चढला. यानंतर चाहत्यांनी रिया व राजीव दोघांनाही जबरदस्त ट्रोल केले. रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्याला पैसे मिळत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय. आता हा दावा किती खरा, किती खोटा ते आम्हाला ठाऊक नाही. पण इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे. सुशांत सिंग राजपूतच्या फॅन पेजवर रियासंदर्भात हा दावा केला जातोय. रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणाऱ्या प्रत्येकाच्या खात्यात तिची पीआर टीम प्रत्येक ट्वीटमागे दोन रूपये जमा करत असल्याचा हा दावा आहे. सुशांतच्या फॅन पेजवर ‘जस्टिस फॉर रिया’ नावाने केल्या गेलेल्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला गेला आहे. ‘रिया परत आलीये आणि ती मनातून आनंदी आहे. तू खंबीर असल्याचे एक चांगले उदाहरण जगापुढे ठेवलेस,’ असे यात लिहिले आहे. दुस-या स्क्रिनशॉटमध्ये संबंधित ट्वीट करणाऱ्याच्या खात्यात 2 रूपये ट्रान्सफर करण्यात आल्याचा मॅसेज दिसतोय. अखेरच्या ट्वीटसाठी तुमच्या खात्यात 2 रूपये ट्रान्सफर करण्यात आलेय, असा हा मॅसेज आहे. हे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. राजीवसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर यूजर्स कमेंट करत आहेत.

नवीन बकरा मिळालेला दिसतोय रियाला. अशा कमेंटस करत तिच्या या फोटोवर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. विशेष म्हणजे हा फोटो पाहून महेश भट्ट यांची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. महेश भट्टसह रियाचे चांगले संबंध होते. महेश भट्ट गरज पडल्यास तिला काय करावे काय करु नये या गोष्टीही सांगत. रियाच्या करिअर मध्ये महेश भट्ट यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शाखाली जसे ते सांगत तसे रिया करायची. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी या सिनेमासाठी मोठमोठी बोली लावली आणि अखेर हॉटस्टारने बाजी मारली. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमासाठी हॉटस्टारने मोठी रक्कम मोजली आहे. महेश भट्टसह रियाचे चांगले संबंध होते. महेश भट्ट गरज पडल्यास तिला काय करावे काय करु नये या गोष्टीही सांगत. रियाच्या करिअर मध्ये महेश भट्ट यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शाखाली जसे ते सांगत तसे रिया करायची. सुशांतच्या निधनावेळी महेश भट्टच्या सांगण्यावरुनच तिने त्याला एकेट सोडून घर सोडले होते.