काय सांगता ! होय, रिया चक्रवर्तीच्या ‘समर्थनार्थ’ ट्विट करणार्‍याला मिळताहेत पैसे ?, Social मीडियावर दावा

पोलिसनामा ऑनलाईन टीम: अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आली. दरम्यान, ती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणा-याला पैसे मिळत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय. इंटरनेटच्या जगात याची सध्या जोरदार चर्चा आहे. सुशांत सिंग राजपूतच्या फॅन पेजवर रियासंदर्भात हा दावा केला जातोय.

रियाच्या सपोर्टमध्ये ट्वीट करणा-या प्रत्येकाच्या खात्यात तिची पीआर टीम प्रत्येक ट्वीटमागे दोन रुपये जमा करत असल्याचा हा दावा आहे. सुशांतच्या फॅन पेजवर ‘जस्टिस फॉर रिया’ नावाने केल्या गेलेल्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला गेला आहे. रिया परत आलीये आणि ती मनातून आनंदी आहे. तू खंबीर असल्याचे एक चांगले उदाहरण जगापुढे ठेवलेस,’ असे यात लिहिले आहे. दुस-या स्क्रिनशॉटमध्ये संबंधित ट्वीट करणा-याच्या खात्यात २ रूपये ट्रान्सफर करण्यात आल्याचा मॅसेज दिसतोय. अखेरच्या ट्वीटटसाठी ‘तुमच्या खात्यात २ रूपये ट्रान्सफर करण्यात आलेय’, असा हा मॅसेज आहे. हे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रिया स्वत: यावर काय खुलासा करते, हे पाहणे अशात इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता या स्क्रिनशॉट्स आणि या दाव्यात किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक नाही.

सुशांत प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या रियाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर तिला जामीन मंजूर झाला. मात्र अद्यापही मीडिया तिचा पिच्छा सोडायला तयार नाही. अशात रियाला तिच्या सोसायटीने राहते घर खाली करण्याची नोटीस बजावल्याचे कळतेय. सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. घर शोधण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ती घराबाहेर पडली. तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात. मीडियाचा पिच्छा सोडवण्यासाठी रिया राहते घर सोडून नवीन घरात शिफ्ट होण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले जात आहे. तूर्तास रिया मुंबईत नवे घर शोधतेय. रिया, तिचे आईवडिल अलीकडे मुंबईत घर शोधताना दिसले होते. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते.