सुशांत सिंह राजपूतचं बांद्रातील बंगला होता ‘भुताटकी’ झालेला ? गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा ‘खुलासा’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केस प्रकरणी मुंबई पोलीस आता सुशांतच्या जवळच्या लोकांची चौकशी करत आहेत. डायरेक्टर मुकेश छाबडानंतर आता पोलिसांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला गुरुवारी (दि 18 जून) बांद्र्याच्या पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. रिपोर्ट्सनुसार रियाची तब्बल 10 तास चौकशी झाली आहे. यावेळी रियाच्या फोनमधील फोटो आणि व्हिडीओ यांचीही तपासणी झाली. या चौकशीत रियानं अनेक खुलासे केले आहेत. सुशांतचं घर सोडण्याचं कारणंही तिनं सांगितलं आहे. इतकंच नाही तर रियानं असा एक दावा केला आहे ज्यानंतर लोक ती गोष्ट अफवा असल्याचं बोलत आहेत.

सुशांतचं बांद्र्यातील घर हाँटेड होतं
एका इंग्रजी वृत्तानुसार, पोलीस चौकशीत रिया म्हणाली की, सुशांतचं बांद्र्यातील घर हाँटेड होतं. याशिवाय या चौकशीत रियानं सांगितलं की, दोघं लवकरच लग्न करणार होते. आधी तर सुशांतच्या घरचे लग्नाच्या बाजूनं नव्हते. परंतु नंतर त्याचं कुटुंब रियाला लाईक करू लागलं. तिचं दोन तीन वेळा सुशांतचे वडिल केके सिंह सोबत बोलणं झालं होतं.

दरम्यान रियानं ब्रांद्र्यातील घर हाँटेड असण्याचा जो दावा केला आहे त्याची खूप चर्चा होत आहे. लोक या गोष्टीला अफवा असल्याचं सांगत आहेत. रियानं असंही सांगितलं की, अंकिता लोखंडे पासून वेगळं झाल्य्यानंतर सुशांत या घरात शिफ्ट झाला होता. फक्त शिफ्टच नाही तर त्यानं पार्टीही केली होती.

पार्टीमुळं परेशान लोक
अशीही माहिती समोर येत आहे की, सुशांतच्या घरात नेहमी होणऱ्या या पार्ट्यांमुळं लोक जास्त वैगातले होते. त्याच्या जवळच्यांनी याबाबत माहिती दिली आहे.