‘मलाही आत्महत्या करावीशी वाटते…मग त्याला जबाबदार कोण असेल ?’ : रिया चक्रवर्ती

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांतच्या कुटुंबीयांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे सीबीआय, ईडी अशा विविध स्तरांमधून रियाची चौकशी सुरु आहे. त्यातच अनेक जण तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलदेखील करत आहेत. त्यामुळेच या सगळ्याला कंटाळून ‘मला आत्महत्या करावीशी वाटते’, असे रियाने म्हटले आहे.

सुशांतच्या आत्महत्यामध्ये आता नार्कोटिक्स हा नवीन मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणीदेखील रियावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या आरोपांविषयी तिला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलत असताना एक बंदूक आणा आणि मला मारून टाका असे ती म्हणाली आहे. आता हे इतकंच बाकी होते. एक काम करा मला आणि माझ्या कुटुंबाला एका रांगेत उभे करा आणि गोळ्या झाडून आमची हत्या करा. नाही तर आम्हीच आत्महत्या करतो, आता मला खरेच असे वाटायला लागले आहे. मी हे सगळे आरोप फेटाळून लावते. कोणताही आधार नसताना हे आरोप करण्यात आले आहेत,असेही रिया म्हणाली. मला खरंच आत्महत्या करावीशी वाटते. फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबीयांनीदेखील आत्महत्या करायला हवी. रोज मरत-मरत जगण्यापेक्षा, ही रोजची बदनामी सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. पण मग मी आत्महत्या केल्यानंतर त्याला जबाबदार कोण? आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत आणि मध्यवर्गीय लोकांसाठी त्यांची इज्जत, आत्मसन्मानचे सगळे काही असते. आज मी ड्रग डिलर आहे, कालपर्यंत मी एक खुनी होते आणि आता आणखी काही असेल. हे खरंच निरर्थक आणि अर्थहीन आहे. मी आतापर्यंत मुद्दाम काही बोलत नव्हते, असे म्हणत रियाने पहिल्यांदाच मौन सोडले आहे .