सुशांतच्या अकाऊंटमधून रियाने खर्च केले 3 कोटी रुपये : बिहार पोलीस

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण लागले आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांतची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार पोलिसांनी रियाच्या बँक अकाऊंटची माहिती काढली आहे. त्यानुसार रियाने 90 दिवसांत सुशांतच्या अकाऊंटमधून तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे रियाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती बिहार पोलिसांनी मिळवली आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. मागील काही दिवसांपासून सुशांतच्या आत्महत्येबद्दल चर्चेणा उधाण आले आहे. त्यानुसार पृकरणाला वेगळे वळण लागले असून मुंबई आणि बिहार पोलिस तपास करीत आहे.