रियानं शेअर केले सुशांतसोबतचे ‘अनसीन’ फोटो, चाहते म्हणाले – ‘तुझ्या कर्माचं फळ तुला मिळणारच’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आज एक महिना झाला आहे. पोलीस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनंही आतापर्यंत कोणतं स्टेटमेंट केलं नव्हतं किंवा सोशलवर कोणती पोस्ट शेअर केली नव्हती. सुशांत गेल्यानंतर आता एका महिन्यानंतर रियानं नुकताच तिचा व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी म्हणजे डिस्प्ले फोटो चेंज केला होता. यानंतर आता रियानं सुशांतसोबतचे दोन अनसीन फोटो शेअर करत इमोशनल नोटही लिहिली आहे. पंरतु यामुळं रिया ट्रोल होताना दिसत आहे. कारण सुशांत गेल्यांतर तिनं त्याचे सर्व फोटो तिनं डिलीट केले होते.

 

 

रियानं तिच्या इंस्टावरून दोन फोटो शेअर केले आहेत. या अनसीन फोटोत दोघंही प्रेमळ क्षण घालवताना दिसत आहे. रियानं यासोबत खूप मोठी पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये रिया म्हणते, “मी तुला विसरू शकत नाही. तू मला प्रेमावर विश्वास करायला शिकवलं आहेस. मला तुला कधी वेगळं करायचं नाही. परंतु आता आपण कधीच भेटू शकणार नाही. तू माझ्यावर किती प्रेम केलंस हे मी शब्दात सांगू शकत नाही. तुझ्या आत्म्याला शांती लाभो यासाठी मी प्रार्थना करेन. तू सोडून गेलास त्याला आज 30 दिवस झाले आहेत. मी आयुष्यभर तुझ्यावर असंच प्रेम करत राहिल. आपल्या दोघांचं प्रेम असंच जिवंत राहिलं असं मी तुला वचन देते.”

युजर म्हणाला- जेव्हा तो जिवंत होता तेव्हा प्रेम…
एका युजरनं रियाच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्विट केलं आहे की, “हे बरोबर नाहीये. जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा तू त्याच्यासोबतचे सर्व फोटो डिलीट केले होते. त्याच्या मृत्यृनंतर हे फोटो अपलोड करून दिखावा करणं बंद कर. देवाला सर्व माहित असतं. तुझ्या कर्माचं फळं तुला नक्कीच मिळेल.