रिया चक्रवर्तीनं खोटा दावा करणार्‍या शेजार्‍याविरूध्द दाखल केली तक्रार, सपोर्टसाठी पुढं आला रितेश देशमुख

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सुशांतसिंह राजपूत प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग प्रकरणात रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळाला आहे. रियाने आता अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे, ज्यांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान कोणताही आधार न देता निवेदने दिली आहेत. माध्यमांना चुकीचे विधान देऊन या प्रकरणाची दिशा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या शेजाऱ्यावर कारवाई करण्याची विनंती रियाने सीबीआयला केली. अशा परिस्थितीत रियाला रितेश देशमुखने पाठिंबा दर्शविला आहे.

सीबीआयच्या विशेष टीम प्रमुख नुपूर शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात रिया म्हणाली की, तिची शेजारी डिंपल थावाणी यांनी खोटा दावा केला आहे की, सुशांत 13 जून रोजी रियाला सोडण्यासाठी तिच्या घरी आला होता. 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या घरी सापडला. रियाने आपले पत्र वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत सीबीआयला दिले आहे. या पत्रात पुढे असे नमूद केले आहे की, प्रथम दृष्ट्या अशा प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 203 ( एखाद्या अपराधाप्रकरणी चुकीची माहिती देणे) आणि 211 (अपराधाचा खोटा आरोप) अंतर्गत दंडनीय आहेत, ज्यात 7 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

रियाच्या या निर्णयाला रितेश देशमुख यांनी पाठिंबा दर्शविला. त्याने ट्वीट केले- तुम्हाला अधिक शक्ती मिळेल. कोणाकडेही सत्यापेक्षा जास्त सामर्थ्य नाही. दरम्यान सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध पटण्यात रिपोर्ट दाखल केला होता. रियावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. बिहार सरकारच्या सूचनेवरून केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला. सुशांत प्रकरणातील आर्थिक अनियमिततेची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली आहे. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणाची चौकशी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोमार्फत केली जात आहे. रियाला एनसीबीने 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती आणि मुंबई हायकोर्टाने 7 ऑक्टोबरला जामीन मिळविला होता. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती देखील एनसीबीच्या अटकेत आहे. मात्र, शौविकचा जामीन मंजूर झाला नाही.