रिया चक्रवर्तीनं माझ्या मुलाची केली हत्या, ती सुशांतवर विषप्रयोग करत होती, वडिलांचा गंभीर आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रिया चक्रवर्ती सुशांतला विष खाऊ घालत होती असा धक्कादायक आरोप
सुशांतच्या वडिलांनी केला आहे. रियानेच सुशांतची हत्या केली असून तिला आणि तिच्या साथीदारांना अटक करावी अशी मागणी के. के. सिंह यांनी केली आहे.

मागील बर्‍याच काळापासून रिया माझ्या मुलाला विष खाऊ घालत होती. तिनेच त्याची हत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि रिया तसेच तिच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांना शिक्षा दिली पाहिजे, असे के. के. सिंह यांनी म्हटले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने काल रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटवरुन तिचा ड्रग्ज डिलर्सशी संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे.

तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केले आहे. सुशांत मृत्यूप्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. रियासंदर्भात नुकताच अमंली पदार्थ सेवनाबाबतचा नवा मुद्दा चौकशीदरम्यान समोर आला आहे. याबाबत ईडीने रियाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले होते. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने यामध्ये ड्रग्जचा वापर आणि व्यापार झाल्याचा ठपका ठेवला आहे. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून ती एमडीएमए, हशिश आणि मारीजुना नवाच्या ड्रग घेत असल्याचे उघडकीस आले आहे.