COVID-19 ला पळवू शकतो सर्दी-तापाचा व्हायरस, रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसवर आजही जगभरात अनेक रिसर्च केले जात आहेत, ज्याद्वारे मोठे खुलासे होत आहेत. असाच एक रिसर्च स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ग्लास्गोमध्ये करण्यात आला आहे, ज्यानंतर शास्त्रज्ञांना आढळले की, सर्दी-तापासाठी जबाबदार असलेला रायनो व्हायरस कोरोनाला पराभूत करू शकतो.

रिसर्च टीममध्ये सहभागी डॉक्टर पाब्लो म्युरिका यांनी बीबीसीला सांगितले की, रायनो व्हायरस सार्स-कोव्ह-2 साठी कोणतीही संधी सोडत नाही. हा त्यास वाईट प्रकारे बाहेर ढकलून देतो. जर मनुष्याच्या शरीरात रायनो व्हायरसचा चांगला प्रभाव असेल तर तो कोविड-19 च्या संसर्गाला रोखू शकतो.

मीडिया रिपोर्टनुसार, काही व्हायरस असे असतात जे मनुष्याच्या शरीराला संक्रमित करण्यासाठी दुसर्‍या व्हायरसशी लढतात. सामान्य सर्दी-तापाचा व्हायरस सुद्धा असाच आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले, रायनो व्हायरसमुळे होणारा फायदा थोड्या वेळासाठी परंतु हा शरीरात असा पसरतो की, कोरोना व्हायरसचा परिणाम कमी करण्यात मदत होऊ शकते.

मात्र, हे अजिबात आवश्यक नाही की, प्रत्येक मनुष्यावर याचा एकसारखा परिणाम होईल. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, ज्यांना सर्दी-ताप आहे किंवा अगोदर होऊन गेला आहे, ते आता कोरोनापासून सुरक्षित झाले आहेत, असा या रिसर्चचा अजिबात अर्थ नाही. हे ठरवणे डॉक्टरांचे काम आहे की, कोणती लक्षणे कोरोनाची आहेत आणि कोणती सुर्दी-तापाची आहेत. यासाठी रिसर्चचे निष्कर्ष विचारपूर्वक घ्यावेत.