Rice Production | भारतात तांदळाचे विक्रमी उत्पादन, बासमती तांदळाचे भाव वधारले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ह्यावर्षी आपल्या देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन (Rice Production) झाले आहे. 2021-22 ह्या आर्थिक वर्षात डिसेंबर अखेर पर्यंत तांदळाचे उत्पादन (Rice Production) 1220 लाख टन पर्यंत झाले आहे. ते आत्तापर्यंतच्या देशातील तांदळाच्या उत्पादनात विक्रमी आहे. गेल्या वर्षी 2020 – 21 साली देशात 1200 लाख टन तांदळाचे उत्पादन झाले होते. तर आर्थिक वर्ष 2019 – 20 मध्ये 1184 लाख टन उत्पादन झाले होते. ह्यावर्षी ही तांदळाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत.

 

ह्यावर्षी संपूर्ण जगात तांदळाचे (Rice Production) उत्पादन सुमारे 5066 लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जगाचे तांदळाचे उत्पादन 5031 लाख टन इतके झाले होते. तर हेच उत्पादन सन 2019-20 मध्ये 5012 लाख टन झाले होते. जगात चीन (China) हा तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश आहे. ह्यावर्षी चीन मध्ये 1500 लाख टन तांदळाचे उत्पादन झाले आहे. प्रत्येक वर्षी जगाचे त्याच बरोबर आपल्या देशाचे तांदळाचे उत्पादन वाढत जात आहे. ह्यावर्षी पाऊस, पाणी, बी बियाणे व हवामान हे योग्य वेळी पिकाला मिळाले आणि जगात व देशात कुठेही पिकाचे नुकसान न झाल्यामुळे देशात व जगात तांदळाचे विक्रमी उत्पादन आले आहे.

 

बासमती तांदळाची 31 हजार कोटी रुपयांची निर्यात
एका बाजूला गेल्या दोन वर्षांपासून कोविडची पहिली लाट (Covid First Wave), नंतर दुसरी लाट, आणि ह्यावर्षीच्या शेवटी शेवटी ओमिक्रोनची लाट (Omicron Wave) हे सगळे असताना सुद्धा देशात तांदळाचे उत्पादन चांगले आले आहे. त्याच बरोबर देशातून बासमती (Basmati) व नॉन बासमती तांदळाची (Non Basmati Rice) निर्यातही चांगल्या प्रमाणात झाली आहे. सन 2019 – 20 साली बासमती तांदळाची निर्यात (Export) 44.50 लाख टन व त्याचे मूल्य साधारणत: 31,025 कोटी रुपये होते. तर 2020 – 21 मध्ये बासमती तांदळाची निर्यात 46 लाख टन झाली व त्याचे मूल्य 31,000 कोटी रुपये होते.

तांदळाची आजपर्यंतची विक्रमी निर्यात
नॉन बासमती तांदळाची निर्यात गेल्या दोन वर्षात म्हणजे सन 2019 – 20 मध्ये 50.35 लाख टन झाली व त्याचे मूल्य रुपयांमध्ये 14,350 कोटी रुपये होते. तर 2020 – 21 मध्ये नॉन बासमती तांदळाची निर्यात 130 लाख टन आणि त्याचे मूल्य सुमारे 35,5000 कोटी रुपये इतके होते. गेल्या आर्थिक वर्षात नॉन बासमती तांदळाची आजपर्यंतची सर्वाधिक विक्रमी निर्यात झाली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशात चांगले उत्पादन आले होते. जगातील बऱ्याच देशांनी गेल्या वर्षी आपल्या कडून नॉन बासमती तांदूळ आयात केला होता. एकूण 130 लाख टन पैकी युरोपियन देशांनी (European Countries) जगात सर्वात जास्त तांदूळ मागविला होता. युरोपियन देशांनी 25 लाख टन तांदूळ आपल्याकडून आयात (Import) केला. त्या पाठोपाठ फिलिपाईन्स (Philippines) 23 लाख टन, चीन 22 लाख टन, सौदी अरब देशांनी (Saudi Arabia) 15 लाख टन, इराण (Iran) व दुबई (Dubai) प्रत्येकी 12 लाख टन, मलेशिया (Malaysia) 11 लाख टन अशा बऱ्याच देशांना भारताने नॉन बासमती तांदूळ निर्यात केला होता.

नॉन बासमती तांदळाची निर्यात वाढली
ह्यावर्षी बासमती तांदळाची निर्यात जी आपण गेल्या बऱ्याच वर्षांपासून 45 ते 50 लाख टन इतकी करीत आहोत ती ह्या आर्थिक वर्षात 2021 – 22 मध्ये पण टिकून राहील असा अंदाज आहे. नॉन बासमती तांदळाची निर्यात सुद्धा साधारणत: गेल्या वर्षीच्या तुलनेने आतापर्यंत चांगली झालेली आहे. ह्यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर महिन्या पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार 130 लाख टन बासमती व नॉन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. त्यामध्ये बासमती 25 लाख टन तर नॉन बासमती 105 लाख टन इतकी निर्यात झाली आहे. रुपयांमध्ये पहायचे तर बासमती तांदळाची निर्यात 15,000 कोटी रुपये तर नॉन बासमती तांदळाची निर्यात 29,000 कोटी रुपये एवढी झाली आहे.

 

बासमती तांदळाची मागणी वाढली
ह्या महिन्यामध्ये सौदी अरब कडून बासमती तांदळाला चांगली मागणी आहे.
एका सौदी कंपनीने नुकताच 40 हजार टन बासमती तांदळाचा सौदा साधारण 1020 डॉलर (USD) प्रति टन या दराने आपल्याकडे केला आहे.
त्यामुळे बासमती, 1121 बासमती, 1401 बासमती,1509 बासमती यांचे दर ह्या महिन्यामध्ये 10% ने वाढले आहेत.
त्याच बरोबर ओमिक्रोन व कोविडची परिस्थिती सुधारत आहे.
त्यामुळे जगभरातून बासमती तांदळाला मागणी चांगली आहे.
म्हणून ह्या महिन्यात बासमती तांदळाचे भाव वाढले आहेत.
पारंपारिक बासमती तांदळाचे दर वाढून 10,000 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.
तर 1121 बासमती तांदळाचे दर वाढून 9000 ते 9500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत झाले आहेत.
अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक व तांदळाचे निर्यातदार राजेश शहा (Jayaraj Group Director Rajesh Shah) यांनी दिली.

 

Web Title :- Rice Production | Record production of rice in India Basmati rice prices goes high

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा