जगातील श्रीमंत देशांनी खरेदी केले ‘कोरोना’ वॅक्सीनचे 50% पेक्षा जास्त डोस : रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनसाठी त्रस्त आहे. अशावेळी माहिती मिळाली की, तुमच्या वाट्याची वॅक्सीन जर कुणी श्रीमंत देशाने जमा करून ठेवली असेल तर तुम्ही काय कराल. होय, अंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमने अभ्यास करून सांगितले आहे की, संपूर्ण जगातील एकुण 13 टक्के संख्येच्या श्रीमंत देशांनी कोविड-19 वॅक्सीनचा 50 टक्केपेक्षा जास्त भाग खरेदी करून आपल्या स्टॉकमध्ये ठेवला आहे.

श्रीमंत देशांनी वॅक्सीनवर काम करणार्‍या कंपन्यांसोबत मिळून अनेक करार आणि व्यापारी सौदे केले आहेत. अंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, अ‍ॅनालिटिक्स कंपनी एयरफिनिटीद्वारे जमा करण्यात आलेल्या डाटानुसार ट्रायल्सच्या अंतिम टप्पयातून जात असलेल्या 5 वॅक्सीनसोबत करार करण्यात आला आहे. यानुसार श्रीमंत देश ज्यांची लोकसंख्या जगाच्या एकुण लोकसंख्येच्या 13% आहे, त्यांनी 50% पेक्षा जास्त वॅक्सीन खरेदी केली आहे.

ऑक्सफॅम अमेरिकेचे रॉबर्ट सिल्व्हरमॅन यांनी म्हटले की, जीवन वाचवणारी वॅक्सीनची उपलब्धता यावर ठरते की, तुम्ही कुठे राहता आणि तुमच्याकडे किती पैसा आहे. एक सुरक्षित आणि प्रभावी वॅक्सीनचा विकास खुप जरूरी आहे. त्यापेक्षा जास्त जरूरी आहे की, ती शंभर टक्के लोकांपर्यंत पोहचावी. ही वॅक्सीन सर्वांसाठी उपलब्ध व्हावी. स्वस्त असावी आणि सहज मिळावी.

ऑक्सफॅमने ज्या वॅक्सीनचा अभ्यास आणि अनालिसिस केले आहे, ज्यामध्ये त्या सर्व वॅक्सीन आहेत ज्यांच्याकडून जगाला आशा आहे. या वॅक्सीन एस्ट्राजेनेका, गामालेया-स्पुतनिक, मॉडर्ना, फायजर आणि सायनोवॅक या कंपन्यांच्या आहेत. या पाचही कंपन्या मिळून एकुण 590 कोटी डोस बनवण्याची क्षमता बाळगून आहेत. या जगातील 300 कोटी लोकांसाठी पुरेशी वॅक्सीन आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला दोन डोस दिले जातील.

या पाच औषध कंपन्यांसोबत अनेक देशांनी करार केले आहेत. श्रीमंत देशांनी या कंपन्यांच्या एकुण क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. म्हणजे कोरोना वॅक्सीनचे 270 कोटी डोस श्रीमंत देशांनी खरेदी केले आहेत. या श्रीमंत देशांमध्ये जगातील केवळ 13 टक्के लोकसंख्या आहे. म्हणजे उर्वरित देशांसाठी वॅक्सीन मिळण्यात अडचण येणार किंवा महागडी वॅक्सीन विकत घ्यावी लागणार आहे.

ज्या श्रीमंत देशांनी या पाच कंपन्यांची वॅक्सीन खरेदी करून स्टॉक करण्याचा प्लॅन बनवला आहे ते आहेत – अमेरिका, ब्रिटेन, यूरोपीय यूनियन, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, मकाऊ, जपान, स्विझरलँड आणि इस्त्रायल. उर्वरित 260 कोटी डोस भारत, बांगलादेश, चीन, ब्राझील, इंडोनेशिया आणि मेक्सिकोमध्ये विकले जातील. जेणेकरून या विकसनशील देशांमध्ये सुद्धा लोकांना कोरोनापासून वाचवता येईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते खुप लवकर वॅक्सीन बाजारात आणणार आहेत. पुढील महिन्यातच वॅक्सीन लाँच केली जाऊ शकते. मात्र, अंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना माहित आहे की, डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, योग्य आणि क्षमतायुक्त वॅक्सीन पुढील वर्षाच्या मध्यापर्यंतच येऊ शकते.