अभिनेत्री ऋचा चड्ढा लग्नाच्या चर्चांमुळं भडकली, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा आणि आणि अ‍ॅक्टर अली फजल दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, दोघं विवाहबद्ध होणार आहेत. असं सांगितलं जात होतं की, दोघंही जून-जुलैमध्ये लग्न करणार आहेत. जेव्हा दोघांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी लग्नाच्या चर्चांना केवळ अफवा म्हटलं आहे.

ऋचा आणि अली फजल गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ऋचानं एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं होतं की, तिनं असं ऐकलं की, ते सकाळी 9 वाजता लग्न करणार आहेत. नंतर अशा बातम्या समोर आल्या की ते वॅलेंटाईन डे च्या दिवशी सायंकाळी 4 वाजता लग्न करणार आहेत. यानंतर असं कळलं की लग्न रद्द झालं आहे. ऋचानं या सर्व बातम्यांचं खंडन केलं आहे. मी अंस काय केलं की, माझं लग्न रद्द झालं हे मला कळत नाही असं ती म्हणाली.

View this post on Instagram

One of my all time favourite photographs of life.. i miss . Arey Mohabbat. Happy Birthday. जन्म दिन मुबारक पार्ट्नर । दूरी भी अजीब चीज़ है – नई ख़ैर अजीब नहीं है , मैं कुछ पोएटिक लिखना चाह रहा था इस्स मौक़े पे। i guess , the photo says it all. Aur himmat bhi nahi hui. . @therichachadha . . . . . . “Yeh nahi jaanta kitna lamba hai safar.. Main shayad jaanta hoon kitna lamba hai safar. Kal bataaoonga. Tum milna . Waheen. Khaton ke teele pe . Kaagaz tumhaara hoga, kalam-dawaat meri, likhaayi tumhaari, chand bol mere, afsaane tumhaare, ghazlein meri, yeh silsila mera , yeh daastaan-e-मोहब्बत हमारी ! “ – M .

A post shared by ali fazal (@alifazal9) on

दोघांच्या लग्नाचं एक फेक कार्डीही सोशलवर व्हायरल झालं होतं. सोशलवर त्यांच्या मुलांची नावंही फायनल करण्यात आली होती. यावर बोलताना ऋचा म्हणते, “अशा लोकांना मला सांगायचं आहे की, आमच्या मुलांच्या अ‍ॅडमिशनसाठी थोडं डोनेशनही जमा करा. कारण आता शिक्षण महाग झालं आहे. ”

View this post on Instagram

क्या तुम मुझसे फ़्रेंड्शिप करोगी ? मैंने दोस्ती भी निभाना सीख़ली है । आजकल काम आती है । हाउ डू यू डू हाहाहा । हाउ डू यू हाहा । हाउ हाउ हाउ । हाड़ा हाड़ा । Ok i will tell story: A blast survivor grows old and dies. Goes to heaven and meets God. Tells him a bomb joke from that day. At which God says “ that’s not funny 😡”. The man replies “ oh you should’ve been there dude” . . . Profoundness in an oxymoron . Pleasure is mine. See you soon babydoll. @therichachadha

A post shared by ali fazal (@alifazal9) on

अलीबद्दल बोलताना ऋचा म्हणते, “मला अलीचं जास्त कौतुक करायचं नाहीये. कारण तो माझ्या डोक्यावर बसेल. इमानदारीनं सांगायचं झालं तर तो खूप कूल आहे. आमच्या आवडी-निवडी काही प्रमाणात मेळ खातात. जेव्हा आम्ही लग्नाचं फायनल करू तेव्हा आम्हीच त्याबद्दल पहिल्यांदा अनाऊंसमेंट करू.”

ऋचानं वॅलेंटाईन डेच्या निमित्तानं अलीसाठी खास लव लेटरही लिहिलं होतं. तिनं इंस्टाग्रामवरून हे लेटर शेअर केलं होतं. ऋचा सध्या आपल्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहे. तिनं सोशलवरून काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता ज्यात ती वेगळ्या लुकमध्ये दिसत होती. परंतु तिनं सिनेमाचं नाव आणि तिच्या रोलबद्दल काहीच सांगितलं नव्हतं.

You might also like