ऋचा चड्डाच्या नव्या सिनेमाचा लुक ‘रिलीज’, करणार आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी ‘भूमिका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पंगा’ या चित्रपटात कबड्डी प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसली. अश्वनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या चित्रपटातील तिचे पात्र खूप प्रभावी होते पण चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसण्याची चाहते वाट पाहत आहे. अधिकृत नसले तरी अप्रत्यक्षपणे तिने आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

https://www.instagram.com/p/B8HBcpEpGVq/

https://www.instagram.com/p/B8HBcpEpGVq/?utm_source=ig_embed

ऋचाने आपल्या ट्विटर हँडलवर स्वतःचे एक नवीन फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती रेशीम सूती साडी आणि चेक ब्लाउज परिधान करताना दिसली आहे. कॅप्शनमध्ये तिने या चित्रपटाविषयी काहीही नमूद केलेले नसले तरी ऋचा चड्ढा हीच्या पुढच्या चित्रपटातील हा तिचा लूक असू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. फोटोत तिने रस्टिक दागिने घातले आहेत आणि तिचा आगामी चित्रपट एक लव्हस्टोरी ड्रामा फिल्म असेल असे बोलले जात आहे.

https://twitter.com/RichaChadha/status/1224526531147419649

https://www.instagram.com/p/B7ORU7ujOEd/

मिळालेल्या माहितीनुसार, ऋचाने नुकतेच एका चित्रपटासाठी लूक टेस्ट केली होती, ज्याची स्क्रिप्ट तिला खूप आवडली होती. अहवालात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा एक चित्रपट आहे ज्यामध्ये ऋचा फिटनेसच्या बाबतीत चित्रपटासाठी फिट बसत आहे. अद्याप अशा काही गोष्टी निश्चित केल्या गेलेल्या नाहीत.

https://www.instagram.com/p/B5C75ibD84g/

ऋचा या चित्रपटाचा भाग होण्यासाठी खूप उत्साही आहे. कारण ऋचाने यापूर्वी कधीही न केलेली भूमिका साकारणार आहे. यामुळे तिला चित्रपटात वेगळ्या पद्धतीने प्रयोग करण्याची संधी मिळेल जी यापूर्वी तिने कधी केली नव्हती. ऋचाची अलीकडेच सीएए आणि एनआरसीला विरोध करण्याविषयी बरीच चर्चा झाली होती.