अभिनेत्री ऋचा चड्ढाचा सिनेमातील योगदानासाठी अवॉर्ड देऊन सन्मान ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadda) हिला भारतरत्न डॉ. आंबेडकर (Bharat Ratna Dr Ambedkar Award) अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय सिनेमातील चांगल्या योगदानाबद्दल तिला हा अवॉर्ड देण्यात आला आहे. राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर रोजी हा सन्मान तिला देण्यात आला आहे. या अवॉर्ड सेरेमनीला फक्त 25 लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

https://www.instagram.com/p/CHuCUMHjkKR/

सन्मान मिळाल्यानंतर ऋचा म्हणते, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मला खूप आनंद होत आहे आणि गर्व वाटत आहे. इंडस्ट्रीत ज्याचा कोणी गॉडफादर नाही, त्याला जेव्हा हा अवॉर्ड मिळतो तेव्हा ही खूप मोठी अचिव्हमेंट असते. यामुळं मला पुन्हा माझ्या स्वप्नांवर विश्वास वाटत आहे.

ऋचा पुढं म्हणते, या विजयानंतर मी खूप खूश आहे आणि आभारीदेखील आहे. मी पुढे अधिक मेहनत करणार आहे. एका आर्टिस्टचा जॉब हा एका एंटरटेनरपेक्षा जास्त असतो. आपली मोठी जबाबदारी ही आहे की, आपण या कठीण काळात मेडिकल स्टाफ आणि कोरोना वॉरियर्सला सपोर्ट करावा.

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती आर्टीकल 375 सिनेमात दिसली होती. याशिवाय तिनं डायरेक्टर अय्यर तिवारी यांचा स्पोर्ट ड्रामा सिनेमा पंगामध्येही काम केलं आहे.