ऋचा चड्ढा स्टारर ‘शकीला’ ‘या’ दिवशी होणार रिलीज !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadda) हिचा शकीला (Shakila) हा आगामी सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. डायरेक्टर इंद्रजीत लंकेश (Indrajit Lankesh) बायोपिकच्या रिलीज बद्दल बोलताना म्हणाले की, आता देशभरातील सिनेमा हॉल सुरू झाले आहेत. त्यामुळं आगामी ख्रिसमस ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. साऊथ इंडियन सिनेमातील सुपरस्टार शकीला च्या बायोपिकवर आधारीत आहे.

90 च्या दशकात मल्याळम सिनेमात होतं मोठं नाव

शकीला मल्याळम सिनेमातील अशी पहिली महिला अ‍ॅक्ट्रेस होती जिनं पुरुषांचं वर्चस्व असताना लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं. 90 च्या दशकात या अ‍ॅक्ट्रेसनं हॉट आणि बोल्ड सीन्स देऊन मल्याळम सिनेमात खळबळ उडवून दिली होती. 2018 मध्ये सिनेमाची शुटींग सुरू झाली होती. आता हा सिनेमा रिलीजसाठी तयार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती आर्टीकल 375 सिनेमात दिसली होती. याशिवाय तिनं डायरेक्टर अय्यर तिवारी यांचा स्पोर्ट ड्रामा सिनेमा पंगा मध्येही काम केलं आहे. आता लवकरच ती शकीला सिनेमात दिसणार आहे. 2008 मध्ये आलेल्या ओए लक्की, लक्की ओए या सिनेमातून ऋचानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. ऋचानं गँग्स ऑफ वासेपूर च्या सीरिजमध्ये काम केलं आहे.

 

 

You might also like