‘तुम हमे दवाई दो, हम तुम्हे मिसाइल देंगे’ ! ‘या’ अभिनेत्रीचा डोनाल्ड ट्रम्प यांना टोला

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे औषध पुरवठा करण्यावरुन अमेरिका आणि भारतामध्ये राजकीय द्वंद पाहायला मिळाले आहे. त्यानंतर भारताने औषधांचा पुरवठा केल्यानंतर अमेरिकेने भारताचे आभार मानले होते. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मिसाईल देण्याची घोषणा केली. त्यामध्ये 155 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची हारपोन ब्लॉक 2 आणि एयर लॉन्चड मिसाइल आणि मार्क 54 लाइटवेट टॉरपेडो दोन मिसाइल्साचा समावेश आहे. या घोषणेवरुन बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने तुम्ही आम्हाला औषधे द्या, आम्ही तुम्हाला मिसाइल देतो अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

https://twitter.com/RichaChadha/status/1249917719136235522

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर रिचाने हे ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आहेत त्यांचा वापर स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणार्‍या रोगात केला जातो. मलेरियाविरोधात वापरल्या जाणार्‍या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे हे औषध आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी 21 मार्चला या गोळ्यांचा वापर करण्याचे सुचवल्याने त्याला महत्व आले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर अ‍ॅझिथ्रोमायसिन बरोबर केला तर कोरोनावर चांगला उतार पडतो असा दावा ट्रम्प यांनी केला होता.