अभिनेत्री ऋचा चड्ढा करणार ‘स्टॅंड – अप’ कॉमेडी, म्हणाली – ‘राजकारणी लोकांकडून मिळतं तगडे आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा सध्या स्टँड-अप कॉमेडीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. ऋचा चड्ढा आता अमेझॉन ओरिजिनल सीरिज, वन माइक स्टँडमधील तापसी पन्नू आणि शशी थरूर यांच्यासारख्या मोठ्या नावांमध्ये स्टँड-अप पदार्पण करणार आहे. ऋचा ठामपणे म्हणाली आहे की, आजकाल राजकारणीही लोक कॉमेडी करुन चांगल्या चांगल्या कॉमेडियनला मागे पाडत आहे.

ऋचा चड्ढाने ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटांमध्ये भोली पंजाबन म्हणून विनोदी भूमिका साकारल्या आहेत. स्टॅंड-अप कॉमेडीमध्ये ऋचा आपला हात आजमावण्यास तयार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ऋचा म्हणाली की, स्टँड-अप कॉमेडीच्या जगात प्रवेश करणे म्हणजे केवळ प्रयोग करण्याशिवाय बाकी काही नाही. ऋचा म्हणाली, ‘मला प्रयोग करायला आवडतात आणि जेव्हा ही संधी आली तेव्हा मी विचार केला की, पाहुया ते कसे होते ते’.

ती पुढे म्हणाली की, हा कार्यक्रम खूप आव्हानात्मक आणि मजेदार अनुभव असेल. कॉमेडीसाठी आजकाल लोक अपशब्दाचा वापर करायला मागे हटत नाही. ‘बर्‍याच वर्षांमध्ये मी बर्‍याच लोकांना विनोदातून व्यक्त होताना पाहिले आहे.

ऋचा म्हणाली, ‘कोणीतरी फक्त सांगितले की, पाकिस्तान आणि चीन भारतात प्रदुषण पसरविणारा विषारी धुर सोडत आहे, अशा वक्तव्यांमुळे राजकारणी स्टॅन्ड-अप कॉमेडियन्सलाही आव्हान देतात. राजकारण्यांच्या अशा वक्तव्यांवरून स्टॅंड-अप कॉमेडियन लोकही रागाने आणि निराश होऊन असे म्हणत आहेत की, ‘आमची नोकरी नका काढून घेऊ यार….’ काही कॉमेडियन म्हणतात की, ‘गायीच्या दुधात सोनं आहे.’ ऋचा सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. लवकरच ती ‘शकीला’ आणि ‘पंगा’ मध्ये दिसणार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like