Richa Chadha म्हणाली – ‘गांजा’ औषधी तर ‘भांग’ शंकराचा प्रसाद, तुम्हाला अपमान करण्याचा अधिकार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता ड्रगचा अँगल समोर आला आहे. सध्या ड्रग मुद्द्यावरून बॉलिवूडमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. सुरुवातीला रियाने तिच्या मुलाखतीत गांज्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर कंगना रनौतने सांगितले की ती बॉलीवूडमधल्या अशा लोकांना ओळखते जे ड्रग पार्ट्यामध्ये सहभागी असतात. तसंच सुशांतची बहीण श्वेताने ड्रगशी संबंधित एक ग्रुपवरील चॅट शेअर केला होता. त्यानंतर ड्रगच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहेत.

https://twitter.com/RichaChadha/status/1299627301156478976

आता अभिनेत्री ऋचा चड्डाने एक खळबळजनक विधान केलं आहे. अशा लोकांवर तिने निशाणा साधला आहे जे मारूआनाला ड्रग म्हणत आहेत. तिने वेदांचा दाखला देत भांग भगवान शंकराचा प्रसाद असल्याचं सांगितलं. महाशिवरात्री आणि होळीमध्ये लोक भांग पितात असंही तिनं सांगितलं. गांजा आणि भांग याचा आधी अभ्यास करा आणि मग बोला असंही ती म्हणाली.

ऋचाने ट्विटमध्ये लिहिलं की, ‘भांग अशा पाच वनस्पतींपैकी एक आहे ज्याचा उल्लेख अथर्ववेदात केला गेला. भांग भगवान शंकराचा प्रसाद असल्याचं सांगितलं, महाशिवरात्री आणि होळीमध्ये लोक भांग पितात. ग्रंथांमध्ये वीडचे अनेक संदर्भ दिसून येतात. ‘इंडिका’ या शब्दाचा अर्थ भारताशी आहे.’ असं ट्विट करत तिने एक फोटो देखील शेअर केला आहे.

या ट्विटला रिट्विट करत ऋचाने लिहिलं, ‘जेव्हा संपूर्ण जगाला गांजाच्या औषधी गुणधर्मांची माहिती मिळत आहे तेव्हा आम्ही याला ड्रग म्हणत आहोत. कृपया थोडा रिसर्च करा, आणि याचा अपमान करणं बंद करा. ज्यांना काहीच माहीत नाही त्यांना आमच्या विश्वासाचा अपमान करण्याचा काहीच अधिकार नाही.’