‘गीतकार’ जावेद अख्तर यांना मानाचा ‘रिचर्ड डॉकिन्स’ पुरस्कार, ‘हा’ पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारचे मानकरी होणारे जावेद एकमेव भारतीय आहेत. हा एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. मानवी विकासाला चालना देणे, धर्म निरपेक्षतेबाबत रोखठोक विचार मांडणे, मानवी मूल्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणे अशा कार्यासाठी हा अवॉर्ड दिला जातो.

जावेद अख्तर यांनी अनेकदा बिंधास्तपणे आपलं मत मांडलं आहे. सुधारीत नागरिकत्व कायदा असो किंवा तबलिगी जमातीचा मुद्दा असो त्यांनी अनेकदा आपलं मत बिंधास्तपण मांडलं आहे. आजवर त्यांना अनके पुरस्कार देण्यात आले आहे. यानंतर आता आणकी पुरस्काराचे ते मानकरी झाले आहेत. 2020 मधील रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बायोलॉजिस्ट रिचर्ड डॉकिन्स यांच्या नावानं रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार देण्यात येतो. 2003 मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर आनंदित झालेले जावेद अख्तर म्हणतात, “हा मी माझा बहुमान समजतो. रिचर्ड यांचं द सेल्फिश जीन हे पुस्तक वाचल्यानंतर मी त्यांचा चाहता झालो. रिचर्ड आजन्म अंधश्रद्धेला विरोध तर वैज्ञानिक दृष्टीकोनाला समर्थन करत राहिले. मी बहुतेक त्यांची सर्व पुस्तकं वाचली आहेत. त्यांचे अंधश्रद्धेवरील सूक्ष्म विश्लेषण वाचल्यानंतर माझ्या या बाबतीच्या विचारांना बळ मिळालं.”

हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. अनेकांनी शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं आहे.