Richest Indian Actress | ‘या’ अभिनेत्री आहेत देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, कोट्यावधी रूपयांच्या मालकीण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Richest Indian Actress | भारतीय चित्रपट सृष्टीची छाप जागतिक स्तरावर दिसते. बॉलीवुडमधील अभिनेत्रीचा (Bollywood Actress) बोलबाला तर सर्वत्र आहे. आपल्याकडील हिरोईनस् या कोट्यावधींच्या मालकीण असलेल्या पाहायला मिळतात. या अभिनेत्री चित्रपटांतील भूमिकांबरोबरच कोट्यावधी रुपयांची गुंतवणुक व व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. आता तुम्हाला वाटत असेल या सर्वांमध्ये सर्वांत श्रीमंत अभिनेत्री (Richest Indian Actress) कोणती ? तर बॉलीवुडची सर्वांत श्रीमंत अभिनेत्री ही दीपिका किंवा आलिया नाहीये तर आपल्या अलौकीक सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी आहे.

1. ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)
मिस वर्ल्ड (Miss World 1994) चा बहुमान मिळवणारी बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एका रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चन ही भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तिची एकूण संपत्ती जवळपास 828 कोटी रुपये आहे इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या एका चित्रपटासाठी सुमारे 10 कोटी रुपये मानधन घेते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचा पोन्नियिन सेल्वन-2 हा चित्रपट रिलीज झाला होता. आता तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

2. प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)
2000 साली मिस वर्ल्डचा (Miss World 2000) किताब जिंकणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. प्रियंका चोप्रा जोनसची (Priyanka Chopra Jonas) एकूण संपत्ती जवळपास 580 कोटी रुपये आहे. प्रियांकाची न्यूयॉर्कमधील रेस्टॉरंटसह इतर व्यवसायातही गुंतवणूक आहे. प्रियांकाने 2003 साली बॉलिवुडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. आता तिने हॉलिवूडमध्ये (Hollywood) ही आपला जम बसवला आहे. प्रियांका चोप्रा ही एक ग्लोबल स्टार आहे.

3.आलिया भट्ट (Alia Bhatt)
आलिया भट्ट ही बॉलिवु़डमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. भारतातील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत आलिया ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती जवळपास 557 कोटी रुपये आहे. आलिया ही आता एका गोंडस मुलीची आई असून काही महिन्यांपूर्वी तिचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट बॉक्स ऑफीसवर गाजला होता. लवकरच तिचा रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

4.करीना कपूर खान (Kareena Kapoor)
आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवुडवर राज्य करणारी अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. करीना श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, करीना कपूरची एकूण संपत्ती सुमारे 440 कोटी रुपये आहे.

5.दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
दीपिका पदुकोण हिने फक्त बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दीपिका आता ग्लोबल स्टार बनली आहे. तिची एकूण संपत्ती जवळपास 314 कोटी रुपये आहे. तिने अनेक स्टार्टअप्स आणि ब्रँड्समध्ये गुंतवणूक केली आहे. दीपिकाच्या काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला पठाण (Pathan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला होता. आता प्रेक्षक तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत.

6.अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने बॉलीवुडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
भारतीय क्रिकेटपट्टू विराट कोहलीची (Virat Kohli) ती पत्नी आहे.
अनुष्का शर्मा नुश (NUSH) या कपड्यांच्या ब्रँडची मालकीण आहे आणि त्याचे बाजारमूल्य सुमारे 65 कोटी रुपये आहे.
अनुष्का शर्मा हिच्याकडे एकूण 255 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

7.माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने व निखळ हास्याने अनेक दशके बॉलीवुडवर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित
ही देखील श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. माधुरीची तिची एकूण संपत्ती जवळपास 248 कोटी रुपये आहे.

8.कतरिना कैफ (Katrina Kaif)
बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही आघाडीची अभिनेत्री आहे.
मागील वर्षी कतरिना अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सोबत लग्नबंधनात अडकली.
कतरिना कैफची एकूण संपत्ती 217 कोटी रुपये आहे.

9.समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)
दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री समं…

Web Title : Richest Indian Actress | ‘This’ actress is the richest actress in the country, owning crores of rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

1920 Horrors Of The Heart Trailer Out | ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; छोट्या पडद्यावरील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Raigad Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावरील शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये तटकरे नाराज, सोहळा अर्ध्यात सोडून माघारी

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांकडून एकाला अटक