रिक्षा चालकाचा ५ वर्षाच्या मुलींवर अत्याचार, खुन करण्यापूर्वी झालं ‘असं’ काही

दरभंगा : वृत्त संस्था – घराबाहेर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या मुलीला फसवुन बागेत घेऊन जाऊन तिच्या बलात्कार करण्याचा प्रकार दरभंगामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. पिडिती मुलीच्या कुटुंबांनी सांगितले की, ही मुलगी एका छोट्या मुलाबरोबर घराबाहेर खेळत होती.

तेव्हा हा रिक्षाचालक येथे आला. त्याने दोघांना आपल्या रिक्षामध्ये बसविले. त्यांना घेऊन गेला. एका बागेतील सुनसान जागेवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. इकडे घराबाहेर मुले न दिसल्याने नातेवाईक त्यांचा शोध घेऊ लागले. तेव्हा मुलीच्या वडिलांची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रिक्षावर पडली. ते रिक्षाजवळ आल्यावर त्यांना मुलीच्या रडण्याचा आवाज आला.

त्यांनी मोबाईलच्या उजेडात पाहिले तर ती त्यांचीच मुलगी रिक्षात होती. त्यांना पाहून रिक्षाचालक पळून गेला. ते थोडे जरी उशिरा पोहचले असते तर तो तिचा खुन करण्याचा शक्यता होती. कारण, त्याच्या हातात चाकू होता. पण वडिल तेथे पोहचल्याने तो पळून गेला. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला रुग्णालयात नेले.
रिक्षाचालकाची ओळख पटली असून तो भगवानपूरचा राहणारा आहे. रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like