रिक्षा चालकाच्या मुलाने विज्ञान शाखेत मिळवला प्रथम क्रमांक तर नावाजलेल्या आजीबाईंच्या शिक्षिकेने मिळवले यश

मुरबाड पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड मधील रिक्षा चालकाच्या मुलाने वडलांची तळमळ पाहत जिद्द ठेऊन अभ्यासा बरोबर फावल्या वेळात आई वडिलांना शेतीच्या कामात मदत करून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळवला मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल लागला असून या मध्ये ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्याचा निकाल 92.83लागला आहे तर मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे हायस्कूलचा 100 टक्के निकाल लागला आहे

मुरबाड तालुक्यातील वाघिवली गावातील रिक्षा चालक पंडीत विशे मुरबाड नाक्यावर रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून. घरची अत्यंत गरीब परिस्थिती पण अत्यंत स्वाभिमानी असणारे विषे यांनी आपल्या मुलाला आभ्यासासाठी लागणारे सर्व गोष्टी वेळेवर उपलब्ध करून शिक्षणा संदर्भात कोणतीही उणीव भासवून दिली नाही जयदीपची आई घरकाम पाहून शेती सांभाळत असून वडील सकाळी शेतावर फेरफटका मारून मुरबाड येथे दिवसभर रिक्षा चालून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत जयदीपने आपल्या आई वडिलांच्या कष्ठाची जाण ठेवत कु.जयदीप पंडित विशे याने 83% गुण मिळवून विद्यामंदिर हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय शिवळे येथून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळऊन आई वडिलांन बरोबर हायस्कूलचे नाव मोठे केले असल्याचे जयदीपच्या वडलांनी सांगितले

जयदीपच्या या यशाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत असून अभिनंदन करत असताना त्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या आई वडिलांना तसेच श्री टुटोरिअल्सचे शिक्षक व विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण भांडे सर यांना दिले आहे या क्लासच्या व विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्या मुले यशाचे शिखर गाठू शकलो जयदीपाच्या या यशाने दाखवून दिले आहे जिद्द, चिकाटी,लक्ष हे गरीबी पुढे शून्य आहे

मुरबाड एवढ्यावर थांबले नसून जगभरात प्रसिद्ध असलेली माळशेज घाटाच्या पायथ्याला भरत असलेल्या फंगणे गावाची अजीबाईंची शाळा ही एक वेगळीच प्रेरणा देत असते याच अजिबांईच्या शाळेत आजीबाईंना शिकवत असलेल्या शाळेच्या शिक्षिका सौ.शितल प्रकाश मोरे यांनी 60% गुण मिळवून बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून लग्नानंतर 18 वर्षा नंतर आजीबाई सारखीच जिद्द चिकाटी आत्मविश्वास आत्मबळ या ताकदीवर प्रथम दहावी आणि आता बारावी 60% नी उत्तीर्ण झाल्याने अजिबांचाही आनंद गगनात मावेनासा झाला असून अजीबाईंच्या शाळेचे शिक्षक योगेंद्र बांगर सह अजीबाईंनी शाळेच्या शिक्षिका शितल मोरे यांना शुभेच्छा देऊन एक वेगळाच आनंद साजरा करून ज्योत हे ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो संदेश दिला