चालकानं त्यासाठी रिक्षा ‘थेट’ रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर नेली, तरीही न्यायालयाने त्याचे गुन्हे केले ‘माफ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – विरारच्या रेल्वे स्थानका थेट लोकलच्या डब्यापर्यंत रिक्षा पोहचल्याचा प्रकार घडला, एका गरोदर महिलेला लोकलमधून रुग्णालयात पोहचविण्यासाठी एका व्यक्तीने रेल्वे स्थानकातच रिक्षा घातली. यानंतर रेल्वे पोलिसांनी त्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला परंतू या प्रकरणी न्यायालयाने रिक्षाचालकाला दिलासा दिला असून त्याच्यावरील सर्व गुन्हे माफ करण्यात आले आहेत.

नक्की काय झाले
मुंबईत पावसाने जोर धरल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान रविवारी सकाळी ९ च्या दरम्यान पती सह एकागरोदर महिला मुंबईतील रुग्णालयात निघाली होती. मात्र लोकल सुरु होण्याआधीच गर्भवती महिलेला कळा सुरु झाल्या, यामुळे तिली तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. त्यावेळी उपस्थित एका पोलिस कर्मचाऱ्यांनी सागर गावड या रिक्षाचालाकास मदतीसाठी बोलवले. यानंतर स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर २ वर महिल्यांच्या डब्याजवळच असलेल्या महिलेला नेण्यासाठी रिक्षा नेण्यात आली. महिलेला याच रिक्षातून पुढे रुग्णालयात नेण्यात आले. जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या १० मिनिटात गर्भवती महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.

मदत केल्याने गुन्हे माफ
या प्रकारानंतर लोहमार्ग पोलिसांनी मात्र या रिक्षा चालकाच्या विरोधात रेल्वे कायदा १५४ आणि १५९ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी जेव्हा न्यायालयासमोर हे प्रकरण गेले तेव्हा सर्व प्रकार कळाल्यानंतर मदतीसाठी रिक्षा रेल्वे स्थानकात नेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर न्यायालयाने सागर या रिक्षाचालकावरील सर्व गुन्हे माफ केले.

आरोग्यविषयक वृत्त –