ICC हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा रिकी पॉन्टिंग ठरला २५ वा खेळाडू

मेलबर्न: वृत्तसंस्था- मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टी ब्रेकमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा आईसीसीने हॉलऑफ फेममध्ये सहभागी करत पॉन्टिंगचा सन्मान केला. रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाकडून आईसीसीचा हॉलऑफ फेममध्ये सामील होणारा २५ वा खेळाडू ठरला. रिकी पॉन्टिंगला आईसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमर ग्‍लेन मैकग्राने ही कॅप दिली.यावर्षी जुलैमध्ये दुबई येथे झालेल्या आईसीसीच्या वार्षिक सभेत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि इंग्लडची महिला विकेट कीपर चार्ली टेलर सोबत पोटिंगलाही हॉल ऑफ फेमची घोषणा  करण्यात आली होती.
रिकी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. ऑस्ट्रेलियाने रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली दोन वर्ल्‍डकप जिकंले आहेत.रिकी पॉन्टिंग एकूण तीन वेळा वर्ल्‍ड कप जिंकणाऱ्या संघात सहभागी होता,तर दोन विश्वचषक ऑस्ट्रेलिया संघाने त्याच्याच नेतृत्वाखाली जिंकले आहेत.२००६,२००७ मध्ये पॉंटिंगला आईसीसीने प्‍लेयर ऑफ द इयर या किताबाने सन्मानित केले होते. या बरोबरच २००६ मध्ये आईसीसी टेस्‍ट प्‍लेयर ऑफ द ईयरचा बहुमान पॉन्टिंगने मिळवला होता.
पॉंटिंगने २०१२ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्‍यास घेतला होता. रिकी पॉन्टिंगने आपल्या कारकिर्दीत १६८ टेस्‍ट सामन्यात  ४१ शतकासह १३ हजार ३७८ धावा, ३७५ वनडेमध्ये ३० शतकासह १३ हजार ७०४ धावा केल्या आहेत.