काँग्रेसमध्ये ‘यादवी’ : मुख्यमंत्री Vs मंत्री, काँग्रेस नेत्यांमध्येच ‘जुंपली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर काँग्रेस नेत्यामध्ये आपापसातच जुंपली आहे. लोकसभा निकालाचा धक्का पचनी न पडल्याने पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्या एक दुसऱ्याप्रती नाराजी वाढली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये देखील मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटबाजी सुरु झाली आहे. तर इकडे मध्यप्रदेशात देखील ज्योतिरादित्य सिंधिया लोकसभेत दारुण पराभवाची कारणे शोधत आहे. त्यात कमी की काय म्हणून तेलंगणामधील काँग्रेसचे तब्बल 12 आमदारांनी टीआरएस या पक्षात प्रवेश केला आहे.
राजस्थान आणि मध्यप्रदेशात डिसेंबर काँग्रेसने विधानसभेत भाजपचा पराभव करून सत्ता मिळवली असली तर 6 महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणूक काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा लागला. राजस्थानात तर एकाही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला नाही.

मध्यप्रदेश –

तर मध्यप्रदेशात फक्त एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. या सर्वाचा दोष ज्या प्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वाला दिला जात असला तरी स्थानिक काँग्रेसला देखील तेवढाच दोष दिला जात आहे. या काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाची हार मानली जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वात देखील आपापसात नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ तर सरकार स्थिर कसे राहिलं हे शोधण्यासाठी हलचाली करत आहेत.

राजस्थान –

याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिनीधीशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी जोधपूर येथे पक्षाला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेतली पाहिजे असे सांगितले होते कारण ते तेथे पक्षाला मोठे यश मिळेल असा दावा करत होते. त्यानंतर दोघांकडून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. यामुळे या दोघात एकमेकांविरोधात नाराजी असल्याचे संकेत मिळाले.

पंजाब –

पंजाबमध्ये तर मुख्यमंत्री अमररिंदर सिंह इतके नाराज झाले की त्यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांचे मंत्रालयच बदलून टाकले. यावर भडकलेल्या सिद्धू यांनी अमरिंदर सिंह यांच्यावर निशाणा साधला. माझे महत्व कमी करणे योग्य नाही. माझा पदावर सार्वजनिक पद्धतीने निशाणा साधला जात आहे. मी तर त्यांना मोठ्या भावासारखे मानले. कायम त्यांचे ऐकले. परंतू मला याचे दुःख होत आहे की माझे मंत्रालय काढून घेतले जात आहे. सामूहिक जवाबदारी कुठे गेली?

लोकसभा निवडणूकांनंतर पराभवाला समोरे जावे लागत असल्याने एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातील स्थानिक नेतृत्वात दिसत आहे. त्यामुळे यापुढे नुकत्याच विधानसभा जिंकलेल्या या राज्यात काँग्रेस पक्षाचा संसार टिकू शकले का यावर चर्चा होताना दिसत आहे.