Right Time to Eat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर वेळेवर करा जेवण, जाणून घ्या तीनवेळचे योग्य टायमिंग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Right Time to Eat | खाण्या-पिण्यात गडबड आणि खराब जीवनशैलीमुळे आजकाल प्रत्येक दुसरा माणूस वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहे. वाढलेले पोट आत जाण्यासाठी लोक जीम जॉईन करण्यापासून ते डाएटिंगपर्यंत आणि धावण्यापर्यंत सर्व करत आहेत (Right Time to Eat). तरीही, असे बरेच लोक आहेत ज्यांना वजन कमी (Weight Loss) करण्यात यश येत नाही. यावर आम्ही योग्य उपाय सांगणार असून ते जेवणाच्या वेळेशी संबंधित आहेत. तुमच्या जेवणाची वेळ ठरवते की तुमचे पोट फिट राहील की बाहेरच्या बाजूला फुगेल (Right Time To Eat For Belly Fat Loss).

 

1. सकाळी वेळेवर करा नाश्ता
सर्वप्रथम नाश्त्याबद्दल (Breakfast) बोलूया. सर्व लोकांची सकाळच्या नाश्त्याची वेळ (Right Time For Breakfast) वेगळी असते. लोक सकाळी कधीही उठले तरी फ्रेश झाल्यावर थोड्या वेळाने नाश्ता करायला बसतात. ही पद्धत योग्य नाही. खरे तर, सकाळी 7 वाजता नाश्त्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. तुम्ही सहसा सकाळी 7.00 ते 7.30 दरम्यान नाश्ता केला पाहिजे. व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे हे करणे शक्य नसेल तर सकाळी 8.30 पर्यंत नाश्ता नक्की करा. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि भुकेचे हार्मोन्स योग्य प्रकारे काम करतात.

2. दुपारच्या जेवणाच्या वेळेकडे ठेवा लक्ष
अनेकांना दुपारी भरपूर जेवायला आवडते. ते कधीही दुपारचे जेवण (Right Time For Lunch) करतात. त्याच वेळी, असे बरेच लोक आहेत जे पोट कमी करण्यासाठी, दुपारचे जेवण बंद करतात आणि सलाडवर काम भागवतात. या दोन्ही पद्धती वजन कमी करण्यासाठी योग्य नाहीत. त्यामुळे पोटाच्या चरबीवर परिणाम होत नाही, उलट शरीराची अंतर्गत पचनसंस्था नक्कीच बिघडते. दुपारचे जेवण आवश्य करा आणि 12.30-1.00 पर्यंत करा. त्यामुळे पोटाची चरबी (Belly Fat) नियंत्रित राहण्यास मदत होते. (Right Time to Eat)

 

3. रात्री लवकर जेवण करा
जे लोक वाढता लठ्ठपणा (Obesity) आणि पोटावरील चरबीशी झुंजत आहेत,
त्यांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळेकडेही (Right Time For Dinner) विशेष लक्ष दिले पाहिजे.
जेवण उशिरा घेतल्यास शरीराला ते पचवता येत नाही आणि रात्री गॅस आणि अपचनाचा त्रास होतो.
यामुळे पोटाची चरबीही सतत वाढत राहते.
रात्रीच्या जेवणासाठी, संध्याकाळी 6.00-7.00 ची वेळ योग्य मानली जाते. रात्रीचे जेवण कमी खावे आणि ते जास्त भाजलेले आणि तळलेले नसावे.
जर तुम्ही खाण्याच्या या वेळेचे काटेकोरपणे पालन केले तर नक्कीच वाढते वजन सहज नियंत्रित करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Right Time to Eat | right time to eat for belly fat loss belly fat loss right time of meal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hip Fracture | शाकाहारी महिलांसाठी जास्त असू शकते हिप फ्रॅक्चरची जोखिम, जाणून घ्या का?

 

Blood Sugar Control | नाश्त्यात समाविष्ठ करा या 5 बिया, ब्लड शुगर आणि Cholesterol होईल कंट्रोल

 

Heart Disease | जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ नव्हे तर ‘या’ 5 पदार्थांचा करा वापर; हार्टच्या आजारांपासून रहाल दूर