Advt.

पर्वती येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात माहिती अधिकार कार्य़कर्त्याला धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जमीन घोटाळा प्रकरणात माहिती अधिकारात माहिती त्याचा पाठपुरावा न करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्याला धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अरुण गवळी गँगच्या एका साथिदाराविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन शहा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बराटे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रवींद्र बराटे हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. त्यांनी पर्वती येथील एका जमीन घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात नितीन शहा यांनी बराटे यांना नगरमुल्यमापर अधिकारी यांच्या इमारतीजवळ भेटले. शहा यांनी बराटेंना पर्वती येथील वादग्रस्त जागे संबंधात पाठपुरवा न करण्यासाठी ५० लाख रुपये देऊ केले. तसेच या प्रकरणातून माघार घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी शहाने दिली असल्याची तक्रार रविंद्र बराटे यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन खडक पोलिसांनी शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करित आहेत.