दुधासह इतर दुग्धजन्य पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘ही’ टेक्नीक ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दूध, दही, पनीर, तूप अशा पदार्थांची आपल्याला रोजच गरज भासत असते. जेव्हा आपण बाजारातून दुग्धजन्य पदार्थ आणतो तेव्हा ते काही कारणांमुळं खराब होतात. दूध आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ कसे टिकवून ठेवावेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) दूध – दूध फाटू नये यासाठी विकत घेतानाच पिशवी किंवा कॅनवरील एक्सपायरी डेट पाहून घ्यावी. उकळून घेताना स्वच्छ पातेल्याचा वापर करावा. दूध उकळल्यानंतर थंड करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अनेकदा दूध खराब होण्याचं कारण म्हणजे दुधाचं भांडं स्वच्छ नसणं हे आहे.

2) पनीर – पनीर एक दिवस किंवा त्यापेक्षा कमी टिकतं. रेफ्रिजरेटर जर 5-7 अंश सेल्सियस तापमानावर असेल तर पनीर 6 दिवस टिकू शकतं. तरीही 3 दिवसात त्याचा पृष्ठभाग पिवळा पडण्यास किंवा पनीर थोडे कडक होण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी पनीर अॅल्युमिनियम फाईलमध्ये पॅक केल्यास रेफ्रिजरेशनच्या तापमानात पनीर उत्तम राहतं. पनीर टिकवून ठेवण्यासाठी ब्लॉटींग पेपरमध्ये ठेवावे.

3) तूप – आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुपाचं सेवन जास्त फायदेशीर ठरतं. तुपात अनेक पोषक घटक असतात. रूम टेंपरेचरवर तूप दीर्घकाळ राहू शकतं. हवाबंद डब्यात जर ठेवलं तर जास्त दिवस राहिल. तुम्ही फ्रीजमध्येही तूप ठेवू शकता. अनेकदा ओलावा येण्याची शक्यता असते.

4) दही – दह्यासाठी पॉलिस्टरीनचे कप बऱ्याच ठिकाणी वापरले जातात. पॉलिप्रोपॅलीन, पीव्हीसी, यांचाही वापर करता येईल. पॉलिस्टरीन किंवा पॉलिप्रोपॅलिनच्या कपात दही पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलं तर 6-7 दिवस टिकू शकतं.