देशात प्रौढ तरुण-तरुणीला विवाह करण्यासाठी मिळाले ‘हे’ अधिकार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासारख्या देशात विवाहाकडे एक पवित्र आणि अतूट बंधन म्हणून पाहिले जाते. सोबतच याकडे असे नाते म्हणून पाहिले जाते, ज्यामध्ये तरुण आणि तरुणी संपूर्ण जीवनभर एकमेकांना साथ देतात. मात्र, अनेकदा तरुण आणि तरुणी प्रौढ असूनही विवाहात जात किंवा धर्मासंबंधी वादसुद्धा दिसून येतो, ज्यामुळे दोघांचा विवाह होऊ शकत नाही किंवा विवाहाच्या अगोदर आणि नंतर अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, देशात प्रौढ तरुण-तरुणीला विवाहाबाबत अनेक अधिकार मिळाले आहेत.

हे आहेत अधिकार

* जर मुलीचे वय 18 वर्षे झाले आहे आणि मुलगासुद्धा 21 वर्षांचा झाला आहे, तर भारतात मुलगा आणि मुलीला आपल्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार आहे.

* प्रौढ मुलगा-मुलगी, ज्यांची मानसिक स्थिती ठीक असेल, त्यांना विवाह करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही.

* प्रौढ मुलगा-मुलीला विवाह करण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या कलम -21 च्या अंतर्गत जीवनांतर्गत मिळाला आहे. हा अधिकार कुणीही काढून घेऊ शकत नाही.

* अधिकारांनुसार, एक प्रौढ मुलगा-मुलगी जर लग्न करत असतील, तर त्यांच्या लग्नात जात, धर्म, प्रदेश आणि भाषा यांसारख्या गोष्टींचा अडथळा येत नाही.

* जर प्रौढ मुलगा-मुलगी यांच्या विवाहात कुणी अडचण निर्माण करत असेल किंवा त्यांना रोखत असेल तर मुलगा-मुलगी संविधानाच्या कलम -226 च्या अंतर्गत हायकोर्टात आणि कलम -32 अंतर्गत सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात.

* जर मुलगा-मुलीचा विवाह झाल्यानंतर त्यांना आपल्याच कुटुंबाकडून जिवाला धोका असेल, तर नवदाम्पत्य सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातून सुरक्षेची मागणी करू शकतात.

* देशात विवाहासाठी अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. हिंदू मॅरेज अ‍ॅक्ट, स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट, फॉरेन मॅरेज अ‍ॅक्ट आणि इंडियन ख्रिश्चन मॅरेज अ‍ॅक्टशिवायसुद्धा अनेक कायदे आहेत. मुलगा आणि मुलगी या कायद्यांतर्गत आपल्या मर्जीप्रमाणे लग्न करू शकतात.