अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला दहा वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. एन. सोनावणे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. विक्रम कोडेने बासूमाटा असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत 5 वर्षीय पीडित मुलीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना डिसेंबर 2016 मध्ये घडली आहे.

पीडित मुलगी तिची आई आणि भावासह कोंढवा भागात राहत होती. त्यावेळी बासूमाटा हा त्यांच्या शेजारच्या खोलीत राहत होता. काही महिन्यांनी पीडित मुलीचे कुटुंब दुसरीकडे राहण्यास गेले. तरीही आरोपी नियमित तिच्या घरी येत. पीडित मुलीस तिच्या आईने घरकामावरून मारहाण केल्याने पीडित मुलीने घरातून पळ काढला. ती यापूर्वी राहत असलेले घरमालकीणीकडे गेली.

तोपर्यंत तिच्या आईने मुलगी हरवल्याची तक्रार दिली. घरमालकीणीने तिला पुन्हा घरी जाण्याचा तसेच याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मुलीने तक्रार दिली. मात्र अत्याचार झाल्याचे तिने तक्रारीत नमूद केले नव्हते. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिने सर्व प्रकार समोर आला. त्यानुसार बासूमाटा यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याचे कामकाज सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी पाहिले. तर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बी. वाय. राऊत यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार सचिन शिंदे यांनी काम पाहिले. तर पोलिस हवालदार संतोष आंगणे आणि पोलिस शिपाई अंकुश केंगले यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

Visit : Policenama.com