हडपसरमध्ये गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर येथील लक्ष्मी कॉलनी परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकिस आला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

महादेव पाटील असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

हडपसर येथील लक्ष्मी कॉलनीमध्ये जास्त वापरात नसलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या आसपास असलेल्या झाडाला सकाळी एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत स्थानिकांना दिसून आला. त्यांनी तात्काळ हडपसर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

मृतदेह खाली उतरवून तो ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान मृत व्यक्ती हा रिक्षाचालक आहे. तो खडकी परिसरात रिक्षा चालवत होता. तर त्याचा भाऊ काळेपडळ येथे राहतो. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.