धक्कादायक ! रिक्षा चालकाने दमबाजी करत केले विद्यार्थीनीशी अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळेत सोडण्यास येणार्‍या रिक्षा चालकाने रस्त्यातच विद्यार्थिनीला दमबाजी करून अश्लिल चाळे करत त्रास दिल्यास प्रकार समोर आला आहे. रिक्षा चालकाला पोलीसांनी अटक केली आहे.

दत्ता गवळी (वय 55, रा. कोथरूड) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींनी मुलीला शाळेत सोडण्यासाठी आरोपीची रिक्षा लावली होती. आरोपी हा पिडीत विद्यार्थिनीला दररोज रिक्षातून सोडण्याचे काम करत होता. गेल्या महिन्यांपासून आरोपी रिक्षा रस्त्यामध्ये एका बाजूला थांबवत असे. तसेच, मुलीशी अश्लिल चाळे करत होता. तसेच, हा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यास बघ काय करतो, अशी धमकी देत होता. त्यामुळे विद्यार्थीनीने घाबरून काही दिवस शांत होती. पण, आरोपीचा त्रास वाढल्यामुळे ती शाळेत जाताना घाबरल्या सारखे करत होती. त्यामुळे तिच्या पालकांनी चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांनी चतुःश्रुंगी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/