RIL AGM 2021 | Jio Phone Next लाँच करण्यासोबतच रिलायन्स AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या काय आहे विशेष?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) 44व्या अ‍ॅन्युएल जनरल मीटिंग (एजीएम) (RIL AGM 2021) मध्ये अनेक मोठ्या आणि विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. कंपनीचे चेयरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एजीएमला संबोधित केले. ril agm 2021 big announcements of reliance annual general meeting check here

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

या दरम्यान, त्यांनी कोरोना (Corona) काळात कंपनीच्या मोठ्या संधी सांगितल्या. याशिवाय त्यांनी गुगलसह मिळून जियोचा नवीन 5जी ‘जियो फोन नेक्स्ट’ फोन लाँच करण्याची घोषणा केली. एजीएममधील मोठ्या घोषणा जाणून घेवूयात…

5जी फोनची घोषणा –
रिलायन्सने आपल्या एजीएममध्ये घोषणा केली की, नवीन ‘जियो फोन नेक्स्ट’ (Jio Phone Next) लाँच केला जाईल. तो गुगलसोबत मिळून तयार करण्यात आला आहे. हा फोन लाँच करताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले की, या फोनचा इंटरनेट स्पीड चांगला असेल. कंपनीचा हा स्वस्त स्मार्टफोन गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला बाजारात येईल.

* 75,000 नवीन नोकर्‍या दिल्या –
मुकेश अंबानी यांनी म्हटले, RIL ने मागील 1 वर्षात 75,000 नवीन नोकर्‍या दिल्या आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिलायन्स देशातील सर्वात मोठी कस्टम आणि एक्साईज ड्यूटी भरणारी कंपनी आहे. आम्ही देशातील सर्वात मोठे merchandise exporter आहोत. आम्ही देशात सर्वात जास्त GST, VAT आणि इन्कम टॅक्स देतो.

* कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू सुमारे 5,40,000 कोटी –
मुकेश अंबानी म्हणाले, मागील वर्षात 3.24 लाख कोटी रुपये इक्विटी कॅपिटल जमवले आहे. आम्ही या विशेष गोष्टीमुळे आनंदी आहोत की, आमचे रिटेल शेयरहोल्डर्सला राईट्स इश्यूतून 4 पट रिटर्न मिळाला आहे. आरआयएलचा कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू सुमारे 5,40,000 कोटी रुपये आहे. आमचा कंझ्यूमर बिझनेस खुप वेगाने वाढला आहे.

* बिझनेस आणि फायनान्स अपेक्षेपेक्षा जास्त वाढला –
मुकेश अंबानी म्हणाले, मागील एजीएमपासून आतापर्यंत आमचा बिझनेस आणि फायनान्स अपेक्षेपेक्षा जास्त वाढला आहे, परंतु आम्हाला सर्वात जास्त आनंद याचा आहे की, आम्ही अवघड काळात सुद्धा मानवतेची सेवा करण्यासाठी प्रयत्न केला. रिलायन्स कुटुंबाने कोरोना काळात चांगले काम केले, ज्यामुळे आज आमचे फाऊंडर चेयरमन धीरुभाई अंबानी यांना आमच्यावर गर्व वाटत असेल.

* ग्रीन एनर्जी प्लॅन –
मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ग्रीन एनर्जी प्लॅनची (Green Energy Plan) घोषणा केली. जामनगरमध्ये 5,000 एकरमध्ये धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्पलेक्स विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. या बिझनेसमध्ये 60,000 कोटी रुपये गुंतवले जातील.

* ग्लोबल होईल रिलायन्स –
याशिवाय मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ग्लोबल झाल्याची सुद्धा घोषणा केली. त्यांनी म्हटले ग्लोबल प्लॅन्सची घोषणा आगामी काळात केली जाईल. सौदी अरामकोचे यासिर अल रुमायन यांना रिलायन्सच्या बोर्डमध्ये सहभागी करण्यात आले आहे, ही त्यांची ग्लोबल बनणण्याची सुरूवात आहे.

* अरामकोसोबत सौदा यावर्षी ऑपरेशनलाईज –
मुकेश अंबानी म्हणाले, यावर्षी कंपनीला आशा आहे की, सौदी अरामकोसोबत झालेला सौदा यावर्षी ऑपरेशनलाईज होईल.

* 15,000 कोटी रुपये गुंतवणुक –
रिलायन्स व्हॅल्यू चेन पार्टनरशिप आणि फ्यूचर टेक्नोलॉजीसवर 15,000 कोटी रुपये गुंतवणुक करणार : मुकेश अंबानी

* नवीन एनर्जी बिझनेस –
2021 मध्ये आम्ही देश आणि जगात ग्रीन एनर्जी डिव्हाईडसाठी नवीन एनर्जी बिझनेस लाँच करत आहोत.
आम्ही रिलायन्स न्यू एनर्जी कौन्सिल बनवली आहे.
कंपनी 100 गीगावॉट सोलर एनर्जी बनवणार आहे : मुकेश अंबानी

* जियो जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी
कोरोना व्हायरस (Corona virus) संसर्ग असूनही जिओचा परफॉर्मन्स चांगला होता.
जियो पहिली अशी कंपनी बनली आहे जी चीनला सोडले तर कोणत्याही देशात 40 कोटीपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत.
या कारणामुळे जियो आज जगातील दुसरी सर्वात मोठी मोबाइल डाटा हँडल करणार कंपनी आहे.

Web Title :- ril agm 2021 big announcements of reliance annual general meeting check here

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव