RIL Mukesh Ambani | ज्युनिअर अंबानींनी फडकावला ध्वज; मुकेश अंबानींनी कुटुंबासोबत साजरा केला स्वातंत्र्य दिन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – RIL Mukesh Ambani | देशातल्या सर्वात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी आपल्या कुटुंबासोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला. विशेष म्हणजे त्यांचा नातू पृथ्वी अंबानी हा देखील हातात तिरंगा घेऊन सहभागी झाला होता. (RIL Mukesh Ambani)

 

सोमवारी संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. मोठ मोठ्या शहरांबरोबरच गावागावात देखील स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. (RIL Mukesh Ambani)

 

मग उद्योग क्षेत्र याला अपवाद कसे ठरेल ? देशातल्या सर्वात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबासमवेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. एएनआय न्यूज एजन्सीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि नातू पृथ्वी अंबानी तिरंगा फडकावताना दिसत आहेत. मुकेश अंबानी यांनी पृथ्वीला कडेवर घेतले आहे. तर, नीता अंबानी पृथ्वीच्या हातात तिरंगा देत आहे. यावेळी कंपनीचे कर्मचारी देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

 

अँटिलिया रंगले तिरंग्याच्या रंगात

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया तिरंग्याच्या रंगात रंगले होते.
निवासस्थानापासून काही अंतरापर्यंत याच रंगाची विद्युत रोशनाई देखील करण्यात आली होती.
ही सगळी सजावट पाहून निवासस्थानाबाहेर लोक सेल्फी घेत होते. एवढचं नाही तर अंबानी कुटुंबाकडून लोकांना शीतपेय आणि चॉकलेट देखील वाटण्यात आले.

 

Web Title : – RIL Mukesh Ambani | reliance industries chairman mukesh ambani celebrates happy independence day 2022 with family

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा