लालू यादव यांचं हेल्थ बुलेटिन जारी, ‘कोरोना’चा देखील रिपोर्ट आला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यांची तब्बेत बिघडली असून त्यांच्यावर रिम्स हॉस्पिटममध्ये उपचार सुरु आहेत. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर सुज सुद्धा आली आहे. दरम्यान त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत नसल्याच्या कारणाने त्यांना दिल्लीतील AIIMS मध्ये पाठवले जाणार असल्याचा निर्णय रिम्स मेडिकल बोर्डाने घेतला आहे.

याच दरम्यान काही वेळापुर्वी लालू यांचे हेल्थ बुलेटिन समोर आले असून त्यामध्ये लालू यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली असून ही दिलासा देणार बातमी मिळाली आहे. मात्र त्यांच्या तब्बेतीमध्ये अद्याप तरी सुधारणा नसल्याचे बुलेटीनमध्ये सागंण्यात आले आहे.

यामध्ये रक्ताच्या चाचणी मध्ये सामान्य संक्रमण दिसून आले आहे. तर HRCT chest scan मध्ये न्यूमोनिया असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लालू यांना दिल्लीतील AIIMS मध्ये पाठविण्याचा निर्णय रिम्स मेडिकल बोर्डाने घेतला आहे.