Ring Road in Pune | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ring Road in Pune | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) पुण्यासाठी (Pune News) मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील रिंगरोडच्या (Ring Road in Pune) भूसंपादनासाठी सरकारकडून पुरवणी अंदाजपत्रकात 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान येत्या मार्चपर्यंत ही तरतूद खर्ची करा,’ असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) दिले आहेत.

मार्चपर्यंत संबधित तरतूद खर्ची करा असा आदेश अजित पवार यांनी दिल्याने रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाच्या कामास लवकर सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune And Pimpri Chinchwad) शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने (MSRDC) हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे 2 टप्पे आहेत. (Ring Road in Pune)

दरम्यान, पूर्व रिंगरोड मावळ तालुका (Maval), खेड तालुका (Khed), हवेली तालुका (Haveli), पुरंदर तालुका (Purandar) आणि भोर तालुक्यातून (Bhor) जाणार आहे. त्याचबरोबर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार आहे. हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या आदेशामुळे आता रिंगरोडसाठीच्या भूसंपादनाच्या कामास लवकर सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Web Title : Ring Road in Pune | provision of rs 1000 crore in supplementary budget from maharashtra Thackeray government for land acquisition of ring road in pune ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात