Rinku Rajguru Boyfriend | अखेर रिंकू राजगुरुला सापडला खऱ्या आयुष्यातील ‘परशा’, सोशल मीडियावर रंगल्या अफेरच्या चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rinku Rajguru | एकेकाळी महाराष्ट्रात ‘सैराट (Sairat)’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. ‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केलं. 29 एप्रिल 2016 रोजी सैराट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. अवघ्या महाराष्ट्राला या ‘सैराट’नं वेड लावलं होतं. सैराट मध्ये मुख्य भूमिका करणारी रिंकू राजगुरू (Rinku Rajguru Boyfriend) अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आहे. नुकतंच रिंकूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Rinku Rajguru Boyfriend) होताना दिसत आहे.

 

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे काही फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये रिंकू डिनरडेटला गेली असल्याचं कळतंय. तर गेल्या काही दिवसांपासून रिंकू कोणाला डेट करते (Rinku Rajguru Boyfriend)? याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र या डिनरडेटच्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये रिंकूच्या अफेअर बद्दलच्या अधिकच चर्चा रंगल्या आहेत.

 

दरम्यान, रिंकू राजगुरूच्या व्हायरल झालेल्या त्या फोटोमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून, चक्क सैराट मधील तिचा प्रेमी आकाश ठोसर (Aakash Thosar) आहे. रिंकू आणि आकाश दोघे एकत्र सैराट या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते. हे फोटो आकाशनं त्याच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केले आहे. फोटोमध्ये ते दोघंसोबत डिनरला जात असताना दिसत आहे. हे फोटो पाहताच सोशल मीडियावर त्या दोघांच अफेर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. परंतु याबाबत रिंकुनं अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

 

Web Title :- Rinku Rajguru Boyfriend | is sairat fem rinku rajguru dating akash thosar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा