‘नाईट लाईफ’ बद्दल अभिनेत्री रिंकु राजगुरूचं उत्तर ऐकून सर्वच ‘कोमात’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत 26 जानेवारी पासून नाईट लाईफला सुरुवात करण्यात आली. नुकताच अभिनेत्री रिंकु राजगुरूला याबाबत प्रश्न विचारला असता तिनं अवाक् करणारं उत्तर दिलं आहे. नाईट लाईफ म्हणजे काय. मला ते माहिती नाही असं म्हणत रिंकुनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

रिंकुचा आगामी सिनेमा मेकअप सध्या चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचे लेखक दिग्दर्शक गणेश पंडित, रिंकु राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांनी पुण्यातील पत्रकार भवनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सिनेमाचा ट्रेलर दाखवण्यात आला. रिंकुला नाईट लाईफबद्दल पत्रकारांनी प्रश्नही विचारला.

रिंकु म्हणाली, “नाईट लाईफ म्हणजे काय. ते काय असतं मला माहिती नाही. मी त्याबद्दल कधी ऐकलं नाही. मला हे प्रकरणच माहिती नाही.” रिंकुला सावरत चिन्मयनं उत्तर दिलं की, “आपल्या सिनेमात एक रात्रीचा प्रसंग आहे. त्या प्रसंगात सर्वत्र लाईट आहेच. नागरिक ते पाहण्याचा आनंद घेत आहेत.” असं त्यानं रिंकुला नाईट लाईफबद्दल सांगितलं.

रिंकुच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आगामी सिनेमा मेकअमध्ये दिसणार आहे. मेकअप या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा गणेश पंडित यांनी लिहिला असून त्यांनीचा हा सिनेमा डायेरक्ट केला आहे. या सिनेमात रिंकु राजगुरूसोबत चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय दीपक मुकूट, बी बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 7 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.